महिला प्रियकराला घरी बोलवायची अन् पतीसमोरच... घडलं भलतंच

मुंबई तक

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर शहरातून आपल्या पत्नीचे तिच्या प्रियकरासोबत विवाहबाह्य संबंध असल्यामुळे सतत मानसिक त्रास झाल्यामुळे पतीने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

ADVERTISEMENT

प्रियकराला घरी बोलवायची अन् पतीला नशेच्या गोळ्या देऊन त्याच्यासमोरच...
प्रियकराला घरी बोलवायची अन् पतीला नशेच्या गोळ्या देऊन त्याच्यासमोरच...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पतीसमोरच बनवायची प्रियकरासोबत संबंध...

point

पत्नीच्या वागण्याला वैतागलेल्या पतीने उचललं टोकाचं पाऊल

Crime News: उत्तर प्रदेशातील बुलंदशहर शहरातून हादरवून सोडणारं प्रकरण समोर आलं आहे. एका युवकाने आपलं आयुष्य संपवल्याची बातमी समोर आली आहे. आपल्या पत्नीचे तिच्या प्रियकरासोबत विवाहबाह्य संबंध असल्यामुळे सतत मानसिक त्रास झाल्यामुळे पीडित व्यक्तीने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

नवऱ्यासमोर प्रियकरासोबत शारीरिक संबंध 

हे प्रकरण बुलंदशहरमधील बादशाहपुरच्या वैर गावातील असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणातील मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आसिफ असं असून त्याच्या भावाने याबाबत पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवली होती. आसिफची पत्नी रूबीनाचे गावातील सलीम नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. सलीम आपली प्रेयसी रूबीनाकडे नशेच्या गोळ्या द्यायच्या आणि त्या गोळ्या ती आपल्या पतीला खायला देत असल्याचा आरोप आहे. आपल्या पतीला नशेच्या गोळ्या दिल्यानंतर ती त्याच्यासमोरच आपल्या प्रियकरासमोर शारीरिक संबंध बनवायची.

हे ही वाचा: Eknath Shinde Mumbai Tak Baithak 2025: 'मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींना उपमुख्यमंत्री समजलोच नाही, त्यांना मी नेहमीच...' एकनाथ शिंदेंनी मनातलं सांगितलं!

पत्नी आणि प्रियकर मिळून मारायचे टोमणे... 

तक्रारीनुसार, 9 जुलै रोजी आसिफने आपल्या भावाला त्याच्यासोबत होत असलेल्या या प्रकाराबद्दल सांगितले. त्यावेळी आसिफने सांगितलं की “रूबीना माझे हात-पाय बांधून माझ्यासमोरच तिच्या प्रियकरासमोर संबंध बनवायची.” त्यावेळी तो काहीच करू शकत नव्हता. आसिफच्या मते, रूबीना आणि सलीम त्याला सतत टोमणे मरत म्हणायचे की “हे सगळं बघून तरी तू मरशील. तसंही तू मरत नाहीयेस. निदान हे बघून तरी तू मरशील आणि आमची वाट मोकळी होईल.”

हे ही वाचा: Shashikant Shinde Mumbai Tak Baithak 2025: 'हिटलरशाही लवकरच संपणार', निलेश लंकेंनी थेट साधला निशाणा.. हिंदुत्वावरही बेधडक बोलले!

वैतागलेल्या पतीने उचललं टोकाचं पाऊल  

आसिफसोबत होत असलेल्या या गंभीर प्रकाराबद्दल त्याने रूबीनाचा भाऊ शाहरूखला देखील सांगितलं. मात्र, त्यावेळी शाहरूखने आसिफला मदत करण्यात नकार दिला. नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनुसार, शाहरूखने आसिफला आत्महत्या करण्याचा सल्ला दिला. शाहरूख म्हणाला, “तू काहीच करू शकत नाहीयेस तर फाशी घेऊन किंवा विष पिऊन मरून जा. माझी बहीण तरी मोकळी होईल.” या सगळ्यामुळे आसिफला मानसिकदृष्ट्या खूप त्रास झाला आणि त्यामुळे फाशी घेऊन स्वत:ला संपवलं. आता आसिफचे नातेवाईक आत्महत्येच्या प्रकरणासंदर्भात तीन आरोपींविरुद्धा कठोरातल्या कठोर कारवाईची मागणी करत आहेत. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp