Shashikant Shinde Mumbai Tak Baithak 2025: 'हिटलरशाही लवकरच संपणार', निलेश लंकेंनी थेट साधला निशाणा.. हिंदुत्वावरही बेधडक बोलले!

मुंबई तक

Shashikant Shinde and Nilesh Lanke NCP SP: मुंबई Tak बैठकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार निलेश लंके आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी त्यांचं महाराष्ट्राबाबतचं राजकीय व्हिजन मांडलं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak Baithak 2025: निलेश लंके आणि शशिकांत शिंदे
Mumbai Tak Baithak 2025: निलेश लंके आणि शशिकांत शिंदे
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई Tak बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि खासदार निलेश लंके

point

पाहा शशिकांत शिंदे आणि निलेश लंके नेमकं काय म्हणाले

point

पाहा शशिकांत शिंदे आणि निलेश लंके नेमकं काय म्हणाले

Mumbai Tak Baithak 2025 NCP SP state president Shashikant Shinde and MP Nilesh Lanke: मुंबई: मुंबई Tak बैठकमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे खासदार निलेश लंके आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राज्यातील सुरू असणाऱ्या राजकारणावर भाष्य केलं. तसंच राजकारणातील पुढील वाटचाल यावर देखील दोन्ही नेत्यांनी त्यांची मतं मांडली. दरम्यान, यावेळी निलेश लंके यांनी मोदी सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. निलेश लंके यांनी केंद्रात असणाऱ्या सरकारची थेट हिटलरशी तुलना केली आहे. दुसरीकडे  त्यांनी महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर जोरदार टीका केली.

'देशाने अनेक हिटलर पाहिले पण हिटलरचा कालखंड हा काही काळच होता. आज जी हुकुमशाही सुरू आहे, ती वाईटच आहे.' असं म्हणत निलेश लंके यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. 

पाहा निलेश लंके आणि शशिकांत शिंदे नेमकं काय म्हणाले:

प्रश्न: हिंदुत्वाबाबत नेमकं काय म्हणणं आहे? 

निलेश लंके : मुंबई असो वा दिल्ली पक्षाने दिलेली जबाबदारी पार पडली पाहिजे. जो गराडा मुंबईत होता तोच गराडा दिल्लीत जमा करण्याची ताकद निर्माण केली. राज्यानुसार भाषा बोलली पाहिजे. हिंदुत्वाबाबत बोलायचं झालं तर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं हिंदुत्व मान्य आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी जातींमध्ये तेढ निर्माण केला जात आहे. परदेशातील लोक हे विकासावर बोलत असतात. पण हे लोक आपल्या जातीपातीवर बोलत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp