Sana Malik, Sneha Dube Mumbai Tak Baithak 2025: 'अजितदादांनी सांगितलंय, अजिबात सेक्युलर विचार सोडणार नाही', सना मलिक स्पष्टच बोलल्या!
Sana Malik, Babasaheb Deshmukh and Sneha Dube: मुंबई Tak बैठकीत बोलताना आमदार सना मलिक यांनी एक मोठं विधान केलं आहे. आपण भाजपसोबत जरी सत्तेत असलो तरी सेक्युलर विचारांशी तडजोड करणार नाही असं अजित पवार यांनी आम्हाला सांगितलं असल्याचं सना मलिक यावेळी म्हणाल्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबई Tak बैठकीत पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेले रोहित पाटील, सना मलिक आणि स्नेहा दुबे

पाहा रोहित पाटील, सना मलिक आणि स्नेहा दुबे नेमकं काय म्हणाले

पाहा रोहित पाटील, सना मलिक आणि स्नेहा दुबे नेमकं काय म्हणाले
Mumbai Tak Baithak 2025 : राज्यात सध्या उजव्या विचारसरणीचं सरकार अस्तित्वात आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हा पक्ष देखील समाविष्ट आहे. यावरून अनेकदा अजित पवार यांना टार्गेटही केलं जातं. अजित पवारांनी सत्तेसाठी सेक्युलर विचारधारेशी फारकत घेतली अशी टीका विरोधक वारंवार करतात. मात्र, याचबाबत आता त्यांच्या पक्षाच्या नवनिर्वाचित आमदार सना मलिक यांनी थेट अजित पवारांनी त्यांना काय सांगितलं याबाबत जाहीर विधान केलं आहे. 'मुंबई Tak बैठक'मध्ये सना मलिक यांनी स्पष्टपणे सांगितलं की, अजितदादांनी सांगितलंय की, 'आपण अजिबात सेक्युलर विचारधारेशी तडजोड करणार नाही.'
मुंबई Tak बैठकीच्या पहिल्याच सत्रात पहिल्यांदाच निवडून आलेले आमदार सना मलिक, स्नेहा दुबे आणि बाबासाहेब देशमुख हे सहभागी झाले होते. ज्यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर त्यांचं व्हिजन मांडलं. पण याचवेळी सना मलिक यांनी एक मोठं विधान केलं आहे.
'भाजपसोबत सत्तेत पण सेक्युलर विचार सोडणार नाही'
प्रश्न: भाजप किंवा भाजपच्या नेत्यांकडून विशिष्ट समुदायाबद्दल बोललं जातं. आक्रमक भाषा वापरली जाते. हल्ला करण्याचे शब्दसुद्धा वापरले जातात, अशा परिस्थितीत तुमच्या मतदारसंघात तुम्हाला अडचण निर्माण होते का?
सना मलिक: निवडणुकीच्या दोन तीन महिन्यांआधीच आम्ही ठरवलं की, आम्ही दादांसोबतच असणार. कारण असं होतं की, अडचणीच्या वेळी जेव्हा मतदारसंघात मला खूप बारकाईने बघावं लागत होतं, तेव्हा दादांकडे जायचो. मी माझ्या कुटुंबासोबत एकत्र बसून ते फायनल केलं. आमच्या अडचणीच्या वेळी ते ठामपणे उभे होते. त्यांच्यासोबत आपण राहणार. आमच्या समोर खूप लोक आले, ते म्हणाले महायुतीत तुम्ही प्रतिनिधी म्हणून उभे राहणार, तर तुमच्या सीटचं नुकसान होईल.