भावाने बहिणीचीच केली निर्घृण हत्या! नंतर, मृतदेह पोत्यात भरला अन् चहाच्या मळ्यात... 'असा' झाला घटनेचा खुलासा
एका चहाच्या मळ्यात तरुणीचा पोत्यात भरलेला मृतदेह आढळला होता. पोलिसांकडून या घटनेमागचं रहस्य उघडकीस आल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भावाने बहिणीचीच केली निर्घृण हत्या!

मृतदेह पोत्यात भरला अन् चहाच्या मळ्यात...

धक्कादायक घटनेचा असा झाला खुलासा
Crime News: उत्तराखंडची राजधानी डेहराडूनच्या वसंत विहार परिसरातून एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथील चहाच्या मळ्यात तरुणीचा पोत्यात भरलेला मृतदेह आढळला होता. पोलिसांकडून या घटनेमागचं रहस्य उघडकीस आल्याचं समोर आलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 22 वर्षीय मृत तरुणीचं नाव विशाखा असून व्यसनाच्या आहारी गेलेल्या तिच्या भावाने तिची हत्या केल्याची माहिती आहे. आरोपीचं नाव विशाल असून पोलिसांनी या प्रकरणासंबंधी विशालचे भाडेकरू लोकेंद्र उर्फ राजाला (26) अटक केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, मुख्य आरोपी विशाल अद्याप फरार असल्याची माहिती आहे.
कसा झाला घटनेचा खुलासा?
सोमवारी विशाखाचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. मृत तरुणीचा मामे भाऊ रोहित कुमार याच्या तक्रारीच्या आधारे, वसंत विहार पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 103(1)च्या अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान, पोलिसांनी विशाखाच्या कुटुंबियांची आणि तिच्या शेजारी राहणाऱ्या लोकांची चौकशी केली. चौकशीतूनच हत्येपूर्वी विशाखाचं विशालसोबत भांडण झाल्याचं समोर आलं. कुटुंबियांनी सुद्धा विशालनेच हत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे.
हे ही वाचा: मुंबईची खबर: CSMT ते ठाणे दरम्यान मेट्रो सुरू होणार... मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा! तारीख सुद्धा ठरली?
त्यानंतर, घटनेच्या तपासादरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. संबंधित फुटेजमध्ये रविवारी (21 सप्टेंबर) रात्री उशीरा दोन व्यक्ती बाइकवरून पांढऱ्या रंगाचं पोतं घेऊन जाताना दिसले. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या मदतीने त्या संशयित व्यक्तींची ओळख विशाल आणि त्याचा भाडेकरू राजा अशी झाली.
भाडेकरूने केला गुन्हा कबूल...
पोलिसांनी राजाची कठोर चौकशी केली असता त्याने सगळी घटना उघडकीस आणली. 21 सप्टेंबर रात्री जवळपास 1 वाजताच्या सुमारास विशाल त्याच्या खोलीत गेला आणि त्यावेळी तो राजाला देखील आपल्या सोबत घेऊन गेला. त्यावेळी, विशाखा जमिनीवर मृतावस्थेत पडलेली आढळली आणि तिचे हात-पाय सुद्धा बांधलेले होते.