गोपीचंद पडळकरांची जीभ छाटणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस, बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक
Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. शरद पवार गटाकडून राज्यभरात निदर्शने केली जात आहे. अशातच आता गोपीचंद पडळकरांची जीभ कापून देणाऱ्याला पाच लाखांचं बक्षीस देण्यात येईल, असं बोललं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

गोपीचंद पडळकरांकडून जयंत पाटलांवर टीका

शरद पवार गटाकडून राज्यभरात निदर्शने
Gopichand Padalkar : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. त्यानंतर आता शरद पवार गटाकडून राज्यभरात निदर्शने केली जात आहे. अशातच आता गोपीचंद पडळकरांची जीभ कापून देणाऱ्याला पाच लाखांचं बक्षीस देण्यात येईल, अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे.
हे ही वाचा : नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर गुंडांकडून प्राणघातक हल्ला, अपोलो रुग्णालयात उपचार सुरु, नेमकं काय घडलं?
पडळकरांनी केलेल्या वक्तव्याने राज्यभरात संतापाची लाट
पडळकरांनी केलेल्या वक्तव्याने राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. त्याविरोधात राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बदलापुरातील झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारले आहेत. तसेच काही कार्यकर्त्यांनी त्यांची प्रतिमा दहन केली. तसेच जजयंत पाटील यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेकही करण्यात आला होता.
जीभ छाटणाऱ्याला पाच लाखांचा इनाम
गोपीचंद पडळकर हे अनेकदा वादग्रस्त विधान करताना दिसतात. त्यामुळे आता कार्यकर्त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. यामुळे आता असे वक्तव्य करू नये. पडखळकरांनी असे वक्तव्य केल्याने आता त्यांची जीभ छाटणाऱ्याला पाच लाखांचा इनाम देण्यात येणार असल्याचं बदलापूर राष्ट्रवादीने स्पष्ट केलं आहे.
हे ही वाचा : 'महिलेचा हात उकळत्या तेलातच...' नणंदेनं भावाला हाताशी धरत भावजयीविरोधात रचला कट, नेमकं काय प्रकरण?
याआधीही गोपीचंद पडळकर यांनी अनेक आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. तसेच अनेकदा बेताल वक्तव्य केले होते. त्यांनी देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांवरही खालच्या पातळीवर टीका केली होती. तसेच उद्धव ठाकरेंवरही त्यांनी टीका केली होती. अशातच आता त्यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका करताना केलेल्या भाषेचा राज्यभरात तीव्र रोष निर्माण झाला आहे.