नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर गुंडांकडून प्राणघातक हल्ला, अपोलो रुग्णालयात उपचार सुरु, नेमकं काय घडलं?
nashik crime : नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही गुडांनी पत्रकारांना बेदम मारहाण केली आहे. या हल्ल्यात तीन ते चार पत्रकारांवर हल्ला केल्यानं ते गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

त्र्यंबकेश्वरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस

पत्रकाराला बेदम मारहाण

अपोलो रुग्णालयात केलं दाखल
Nashik Crime : नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही गुडांनी पत्रकारांना बेदम मारहाण केली आहे. या हल्ल्यात तीन ते चार पत्रकारांवर हल्ला केल्यानं ते गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना स्वामी समर्थ केंद्राजवळील असलेल्या कमानीच्या परिसरात घडली आहे.
हे ही वाचा : 'तुझा मुळशी पॅटर्नच करीन...', आधी बरकडीवर अन् नंतर करंगळीवर धारदार शस्त्राने केले वार, नंतर मोटारसायकने केला पाठलाग...
कोणी केली मारहाण?
घटनास्थळी वाहनांच्या प्रवेशासाठी पावती घेणाऱ्या व्यक्तींपैकी काही व्यक्तींनी पत्रकारांवर हल्ला केला होता. पत्रकार वार्तांकनासाठी त्र्यंबकेश्वरला गेले असता, काही लोकांनी त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचं मन हेलावून टाकणारं धक्कादायक वृत्त आता समोर आलं आहे.
पत्रकाराला अपोलो रुग्णालयात केलं दाखल
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांवर गंभीर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तीन ते चार पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या हल्ल्यातील एक पत्रकार हे गंभीर अवस्थेत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारासाठी नाशिकच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे ही वाचा : जन्मलेल्या 20 दिवसांच्या बाळाला जमिनीत पुरलेलं, नंतर मेंढपाळानं पाहिलं अन् शरीरावर प्राण्यांनी चावा घेत नंतर...
घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांचा फौजफाटा हा घटनास्थळी दाखल झाला होता. त्यामुळे सध्या घटनास्थळावरील वातावरण निवळलं गेलं आहे. पण, पत्रकारांना केलेल्या मारहाणीविरोधात पोलीस प्रशासन नेमकं काय पाऊल उचलेल याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. या दुर्दैवी घटनेनंतर पत्रकार बांधवांकडून मोठा निषेध व्यक्त केला जात असून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.