'तुझा मुळशी पॅटर्नच करीन...', आधी बरकडीवर अन् नंतर करंगळीवर धारदार शस्त्राने केले वार, नंतर मोटारसायकने केला पाठलाग...

मुंबई तक

Beed crime : तुझा मुळशी पॅटर्न केल्याशिवाय तुला जिवंत सोडलं जाणार नसल्याची धमकी देखील दिली होती.

ADVERTISEMENT

Beed crime
Beed crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'तुझा मुळशी पॅटर्नच करीन'

point

घराच्या आतून कडी लावली

point

नेमकं काय घडलं? 

Beed Crime : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून बीड जिल्ह्याला बीडचा बिहार झाल्याचं म्हटलं जातंय. कारण बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील मगरवाडी फाटा येथे दोन तरुणांनी एका तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर आज माझा वाढदिवस आहे तुझा मुळशी पॅटर्न केल्याशिवाय तुला जिवंत सोडलं जाणार नसल्याची धमकी देखील दिली होती. या प्रकरणी गोपाल भागवत जाधव (वय 26) यांने पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली.

हे ही वाचा : सातारा हादरलं! पतीचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय, नंतर लोखंडी रॉडनेच केला हल्ला, महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात...

नेमकं काय घडलं? 

तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, गोपाल भागवत जाधव हे 19 सप्टेंबर रोजी माझ्या मालकीचे अंबाजोगाई परळी रोड मगरवाडी फाटा येथे असलेल्या माऊली अॅग्रो एजन्सी कृषी केंद्र दुकानात बसले होते. तेव्हाच सायंकाळी 5:00 वाजताच्या सुमारास जयपाल अशोक माने आणि त्याचे इतर दोन मित्र निशांत विष्णू जाविर हे दोघेही लघुशंकेसाठी दुकानाच्या शेजारी गेले होते. तेव्हा त्यांनी आवाज दिल्यानंतर तरुणाने त्यांना कसलाही प्रतिसाद दिला नाही. प्रतिसाद न दिल्यानेच त्यांनी तरुणावर प्राणघातक हल्ला केला.

लोखंडी धारदार शस्त्राने त्यांनी माझ्या मानेवर हल्ला केला होता. त्यानंतर त्यांनी माझ्या बरकडीत सपासप वार केले. तेव्हा तरुणाने हाताने आडवले असता, पीडिताच्या डाव्या हाताच्या करंगळीवर वार करण्यात आले होते. तेव्हा ढकलून देऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि घटनास्थळावरून पळ काढला होता. तेव्हा त्याच्या मागे आरोपी मोटारसायकलवरून पाठलाग करू लागले. निशांत विष्णु जाविरने धमकी दिली की, माझा आज वाढदिवस आहे, तुझा एका झटक्यात मुळशी पॅटर्न केल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणू लागला होता.

हे ही वाचा : ट्यूशनसाठी घराबाहेर पडली मुलगी, नंतर दोघांनी अपहरण करत केलं लैंगिक शोषण अन् 'त्या' ठिकाणी दिलं फेकून...

घराच्या आतून कडी लावली अन्...

त्यानंतर पीडित तरुण डिव्हायडर क्रॉस करून पळ काढू लागला होता. तेव्हा दोघेही मोटारसायकलने आंबेजोगाईच्या दिशेने पाठलाग करू लागले होते, परंतु डिव्हायडर संपल्याने नंतर गावातील सचिन भोसले नावाच्या तरुणाच्या घरात शिरलो आणि आतून कढी लावत लपून बसलो.

हे वाचलं का?

    follow whatsapp