जन्मलेल्या 20 दिवसांच्या बाळाला जमिनीत पुरलेलं, नंतर मेंढपाळानं पाहिलं अन् शरीरावर प्राण्यांनी चावा घेत नंतर...
crime news : एका गावात मेंढी चरायला मेंढपाळ गेल्यानंतर त्याला एका लहान बाळाचा आवाज ऐकू आला होता. तेव्हा त्या लहान बाळाला पुरण्यात आले होते. त्या मातीतून लहान बाळाचा हात दिसू लागला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बाळाला मातीत पुरलं

मेंढपाळालनं बघितलं

नंतर नेमकं काय घडलं?
Crime News : एका गावात मेंढी चरायला मेंढपाळ गेल्यानंतर त्याला एका लहान बाळाचा आवाज ऐकू आला होता. तेव्हा त्या लहान बाळाला पुरण्यात आले होते. त्या मातीतून लहान बाळाचा हात दिसू लागला होता. त्याने कसलाही क्षणाचाही विलंब न करता गावकऱ्यांना आणि पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणाचा तपास घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मातीत गाडलेले लहान बाळ बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. ही घटना शहाजहानपूर जिल्ह्यातील एका गावातील आहे.
हे ही वाचा : 'तुझा मुळशी पॅटर्नच करीन...', आधी बरकडीवर अन् नंतर करंगळीवर धारदार शस्त्राने केले वार, नंतर मोटारसायकने केला पाठलाग...
जन्माला येऊन बाळाला अवघे 20 दिवस झाले होते...
जन्माला येऊन बाळाला अवघे 20 दिवस झाले होते. तिच्यावर तातडीने सरकारी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले होते. तेव्हा रुग्णालयाचे डॉ. राजेश कुमार यांनी सांगितलं की, बाळ अत्यंत गंभीर अवस्थेत होते. त्याच्या तोंडात अन् नाकात चिखल गेलेला होता. श्वास घेण्यास त्रास आणि ऑक्सिजनची पातळी खालावली होती. तसेच बाळाच्या शरीरावर प्राण्यांनी चावा घेतल्याच्या खुणा दिसू लागल्या होत्या.
बाळाला मातीत पुरल्यानंतर...
संबंधित प्रकरणात डॉ. कुमार यांनी सांगितलं की, हे बाळ मातीत पुरल्यानंतर लगेचच सापडलं असावं. त्या बाळाच्या शरीरावरील काही जखमा बऱ्याही झाल्या नव्हत्या. बाळावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. संबंधित घटनेची माहिती चाईल्ड हेल्पलाईनला माहिती देण्यात आली होती. अशा घटना पहिल्यांदाच नाही.तर 2019 मध्येही असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
हे ही वाचा : प्रेयसीचा विनयभंग केल्याचा प्रचंड राग... संतापलेल्या प्रियकराने फिल्मी स्टाइलने घेतला बदला! नेमकं काय घडलं?
आपण आज 21 व्या शतकात राहतोय. पण याच शतकात घरसलं गेलेलं लिंग गुणोत्तर हे येणाऱ्या भविष्यासाठी धोक्याचे संकेत आहेत. अनेकांना वंशाचा दिवा हवा असतो, पण पणती नको असते. यातूनच अशा घटना घडतात आणि मुलीचा जन्म झाल्याने तिला अशा पद्धतीने पुरलं जातं.