प्रेयसीचा विनयभंग केल्याचा प्रचंड राग... संतापलेल्या प्रियकराने फिल्मी स्टाइलने घेतला बदला! नेमकं काय घडलं?

मुंबई तक

एका तरुणाने आपल्या प्रेयसीसोबत झालेल्या छेडछाडीचा अगदी फिल्मी स्टाइलने बदला घेतल्याची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील झुंझुनू येथे ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

संतापलेल्या प्रियकराने फिल्मी स्टाइलने घेतला बदला!
संतापलेल्या प्रियकराने फिल्मी स्टाइलने घेतला बदला!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रेयसीचा विनयभंग झाल्याने प्रियकर प्रचंड संतापला

point

फिल्मी स्टाइलने घेतला बदला! नेमकं काय घडलं?

Crime News: एका तरुणाने आपल्या प्रेयसीसोबत झालेल्या छेडछाडीचा अगदी फिल्मी स्टाइलने बदला घेतल्याची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील झुंझुनू येथे ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे. या शहरातील ढाणी बाढानमध्ये राहणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाने आपल्या प्रेयसीसोबत झालेल्या छेडछाडीचा बदला घेण्यासाठी 21 वर्षीय तरुणावर कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. प्रकरणातील मृत तरुणाचं नाव पंकज कुमावत असल्याची माहिती आहे. हत्येनंतर, आरोपीने मृतदेह गावातील एका कोरड्या विहिरीत फेकून दिला जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये.

मृतदेह कोरड्या विहिरीत फेकून दिला  

14 सप्टेंबर रोजी संध्याकाळी पंकज घराबाहेर पडला होता. पण रात्री उशीरापर्यंत तो घरी परतलाच नाही. यामुळे कुटुंबियांना देखील पंकजची चिंता वाटू लागली. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 सप्टेंबर रोजी मृताचे वडील राजेंद्र कुमावत यांनी पोलिसात आपला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र, त्याच्या दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना पंकजचा मृतदेह कोरड्या विहिरीत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी यासंदर्भात तातडीने हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली. पोलीस पथकांनी तपासादरम्यान, सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्स तपासले. त्यावेळी, पंकजला सतत फोन करणाऱ्या एका अल्पवयीन मुलावर पोलिसांना संशय आला.

हे ही वाचा: पत्नीला नशेचं औषध देऊन बेशुद्ध केलं, नंतर गळा दाबून... शेवटी, मृतदेह विहिरीत फेकला अन्...

प्रेयसीचा विनयभंग केल्याचा बदला  

पोलिसांनी लगेच त्या अल्पवयीन मुलाला अटक करून चौकशी सुरू केली. तेव्हा चौकशीदरम्यान, आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. पंकजने घटनेच्या पाच दिवसांपूर्वी आपल्या प्रेयसीचा विनयभंग केला असल्याचं आरोपीने सांगितलं. आरोपीच्या प्रेयसीने त्याला याबद्दल सांगितले असता त्याने पंकजचा बदला घेण्याचं ठरवलं. 14 सप्टेंबर रोजी आरोपीने पंकजला फोन करून त्याच्या घराजवळील एका झोपडीत बोलावलं. सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास ते दोघे एकत्र चालत असताना मागून येणाऱ्या आरोपीने अचानक पंकजच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केला. पंकज खाली पडल्यानंतर सुद्धा आरोपीने पुन्हा त्याच्यावर वार केला ज्यामुळे पंकज जागीच ठार झाला.

हे ही वाचा: ऑनलाइन प्रेमाच्या जाळ्यात फसली विवाहिता! आधी न्यूड व्हिडीओ, नंतर लाखो रुपये अन्...

आधीच कुऱ्हाड सोबत ठेवली... 

आरोपीने हत्येसाठी आधीच कुऱ्हाड सोबत आणली होती, असं तपासात समोर आलं. पंकजने आरोपीकडे असलेल्या कुऱ्हाडीबद्दल विचारलं तेव्हा ती कुऱ्हाड आपल्या काकांना द्यायची असल्याचं आरोपीने सांगितलं. हत्येनंतर आरोपीने पंकजचा मृतदेह ओढून कोरड्या विहिरीत फेकून दिला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली असून पंकजच्या हत्येकांडाचं सत्य उघडकीस आलं आहे. या खळबळजनक घटनेमुळे परिसरात याबाबत बरीच चर्चा रंगत असल्याचं सांगितलं जात आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp