पत्नीला नशेचं औषध देऊन बेशुद्ध केलं, नंतर गळा दाबून... शेवटी, मृतदेह विहिरीत फेकला अन्...
सकाळी पोलिसांनी विहिरीतून एका महिलेचा मृतदेह बाहेर काढला. महिलेचे हात, पाय आणि तोंड बांधून, पोत्यात भरून आणि नंतर तिची हत्या करून मृतदेह विहिरीत लपवून ठेवण्यात आला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भयानक कट रचून केली पत्नीची हत्या...

शेवटी, मृतदेह विहिरीत फेकला अन्...
Murder case: उत्तर प्रदेशातील हापूड जिल्ह्यातील सिम्भाओली पोलीस स्टेशन परिसरात आज (19 सप्टेंबर) सकाळी पोलिसांनी विहिरीतून एका महिलेचा मृतदेह बाहेर काढला. महिलेचे हात, पाय आणि तोंड बांधून, पोत्यात भरून आणि नंतर तिची हत्या करून मृतदेह विहिरीत लपवून ठेवण्यात आला होता. हत्येनंतर, आरोपी पतीने दिशाभूल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बेपत्ता महिलेची तक्रार दाखल केली. त्यावेळी महिलेच्या कुटुंबियांना त्यांची मुलगी न कळवताच घरातून पळून गेली असल्याचं सांगण्यात आलं. पण पोलिसांनी हत्येचा सूत्रधार असलेल्या पतीचा संपूर्ण कट काही वेळातच उघडकीस आणला.
पोलिसांच्या चौकशीदरम्यान, आरोपी पतीने आपला गुन्हा कबूल केला असून पत्नीच्या हत्येचा संपूर्ण कट रचल्याचं उघड केलं. पतीच्या निर्देशानुसार, आज पहाटे 4 वाजता गावातील एका विहिरीतून महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
15 वर्षांपूर्वी झालं लग्न...
मेरठमधील अजराडा गावातील रहिवासी गुलशन प्रवीण नावाच्या महिलेचं सुमारे 15 वर्षांपूर्वी हापूड जिल्ह्यातील सिंभावली पोलीस स्टेशन परिसरातील वेट गावाचा रहिवासी मोहम्मद आझाद नावाच्या तरुणासोबत लग्न झालं होते. या जोडप्याला चार मुलं असल्याची माहिती आहे. लग्नानंतर काही दिवसांनंतर या दोघांमध्ये भांडणे सुरू असल्याचं मृत महिलेच्या कुटुंबियांनी सांगितलं. पीडितेचा पती तिला बऱ्याचदा मारहाण करत असायचा.
पती नोकरी करत नसल्याने आर्थिक अडचण...
मोहम्मद आझाद काम करत नसल्याने घरातील आर्थिक अडचणींमुळे त्रस्त असलेल्या त्याच्या पत्नीने त्याला बाहेर जाऊन काम करण्यास सांगितलं असल्याचा आरोप आहे. यामुळे पती-पत्नीमध्ये बऱ्यादा वाद व्हायचे. गेल्या काही काळापासून हा वाद सुरू होता. आरोपी पतीने यावरून पत्नीला सतत मारहाण केली. महिन्याभरापूर्वीच हा वाद महिला पोलिस ठाण्यात पोहोचला.