ऑनलाइन प्रेमाच्या जाळ्यात फसली विवाहिता! आधी न्यूड व्हिडीओ, नंतर लाखो रुपये अन्...

मुंबई तक

एका 34 वर्षीय विवाहित महिला डिजीटल प्रेमाच्या जाळ्यात फसली आणि त्यामुळे तिच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली. संबंधित महिलेला ऑनलाइन प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याकडून लाखो रुपये उकळल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

आधी न्यूड व्हिडीओ, नंतर लाखो रुपये अन्...
आधी न्यूड व्हिडीओ, नंतर लाखो रुपये अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑनलाइन प्रेमाच्या जाळ्यात फसली विवाहिता!

point

आधी न्यूड व्हिडीओ, नंतर लाखो रुपये अन्...

Crime News: मध्य प्रदेशातील ग्वालियरमध्ये एका 34 वर्षीय विवाहित महिला डिजीटल प्रेमाच्या जाळ्यात फसली आणि त्यामुळे तिच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली. संबंधित महिलेला ऑनलाइन प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याकडून लाखो रुपये उकळल्याची बातमी समोर आली आहे. एका तरुणासोबत डिजीटल प्लॅटफॉर्मवर झालेल्या मैत्रीत पीडिता इतकी वेडी झाली की तिने तिचा न्यूड व्हिडीओ काढून त्या अनोळखी व्यक्तीला पाठवला. त्यानंतर, आरोपीने पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. नेमकं काय घडलं? 

सोशल मीडियावर झाली मैत्री 

पीडित महिलेने पोलिसात केलेल्या तक्रारीच्या आधारे, एका महिन्यापूर्वी त्या महिलेला एका अनोखळी नंबरवरून कॉल आला होता. त्या कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपलं नाव विपिन आणि स्वत: एनआरआय असल्याचं सांगितलं. त्यावेळी, आरोपीने त्या महिलेला तिच्याशी मैत्री करायची असल्याचं सांगितलं. त्या दिवसापासून ती महिला सुद्धा आरोपीच्या बोलण्यात येऊन आपल्या पतीपासून लपून त्या तरुणाशी बराच काळ फोनवर बोलायची. 

न्यूड व्हिडीओ पाठवला अन्...

काही दिवसांनंतर, विपिनने त्या महिलेला लंडनला येण्यास सांगितलं. पण, पीडितेने त्याला नकार दिला. दोघांच्याही मैत्रीचं प्रेमात रूपांतर झाल्याने आरोपीने पीडितेकडे तिचे फोटो मागण्यास सुरू केलं. संबंधित महिलेने सुद्धा आरोपीवर विश्वास ठेवून त्याला आपले बरेच फोटो पाठवले. इतकेच नव्हे तर पीडितेने आरोपीच्या मागणीनुसार, तिचा न्यूड व्हिडीओ बनवून तरुणाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवलं. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: लवकरच खुला होणार मुंबई सेंट्रलवरील 'हा' ब्रिज... महत्त्वाची अपडेट आली समोर!

गिफ्ट पाठवण्याच्या बहाण्याने लाखो रुपये लुबाडले

व्हिडीओ पाठवल्यानंतर आरोपीने पीडितेला गिफ्ट पाठवण्याच्या बहाण्याने तिच्या आधारकार्डची फोटो कॉपी सुद्धा मागवून घेतली. त्यावेळी, आरोपीने महिलेला एका पार्सल घेण्यास सांगितलं. दुसऱ्या दिवशी, महिलेला अनोळखी नंबरवर कॉल आला आणि त्यावेळी फोन करणाऱ्याने महिलेचं पार्सल आलं असून ते घेण्यासाठी 15,000 रुपये जीएसटी भरावी लागणार असल्याचं सांगितलं. पीडितेने सुद्धा कसलाही विचार न करता ते पैसे भरले. त्यावेळी, आरोपी तरुणाने बरीच टेक्निकल कारणे सांगून तिला मोबाईलवरून पेमेन्ट करायला सांगितलं. आरोपीच्या बोलण्यात येऊन महिलेने त्याला 3 लाख 76 हजार रुपये पाठवले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp