कोकणासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा हाहाकार, हवामान विभागाचा अंदाज काय?
maharashtra rain update: राज्यात हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार राज्यातील मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांनुसार हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राज्यातील हवामान विभागाचा अंदाज

25 सप्टेंबर रोजी हवामान विभागाचा अंदाज
maharashtra rain update : राज्यात हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांत हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच काही ठिकाणी मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता आहे. 25 सप्टेंबर रोजी हवामान विभागाचा अंदाज कसा असेल याची माहिती जाणून घेऊयात.
हे ही वाचा : नंदुरबार हादरलं! तरुणाची दिवसाढवळ्या चाकूने सपासप वार करत हत्या, आदिवासींच्या मोर्चाला वेगळं वळण, जमावाची पोलिसांवर दगडफेक
कोकण विभाग :
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. कोकणातील पालघर जिल्ह्यात मध्य स्वरुपाच्या पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातही वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हलका ते मध्यम स्वरुपाचा वादळी वाऱ्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक घाट, अहमदनगर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सांगली येथे हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.