Eknath Shinde Mumbai Tak Baithak 2025: 'मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींना उपमुख्यमंत्री समजलोच नाही, त्यांना मी नेहमीच...' एकनाथ शिंदेंनी मनातलं सांगितलं!

मुंबई तक

Eknath Shinde Shiv Sena: मी मुख्यमंत्री असताना कधीही देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री समजलो नाही. असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी मुंबई Tak बैठक या विशेष कार्यक्रमात आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.

ADVERTISEMENT

Mumbai Tak Baithak 2025: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Mumbai Tak Baithak 2025: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई Tak बैठकीत शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

point

पाहा एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले

point

महाराष्ट्रातील राजकारणावर एकनाथ शिंदे यांचं व्हिजन

Mumbai Tak Baithak 2025 DCM Eknath Shinde: मुंबई: 'जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा माझ्यासोबत देवेंद्र फडणवीस, अजितदादा होते. देवेंद्रजींना मी कधीही उपमुख्यमंत्री समजलो नाही. मी त्यांना माझ्यासोबत मुख्यमंत्रीच समजलो. आम्ही टीम म्हणून काम केलं.त्यामध्ये छोटा-मोठा काही नाही.' असं म्हणत एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मनातील भावना या मुंबई Tak बैठकीत बोलून दाखवल्या.

पाहा एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले:

'खरं म्हणजे वयाच्या 18 वर्षापासून मी आनंद दिघे साहेबांसोबत काम करत होतो. तेव्हा मी शाखाप्रमुख झालो. त्यावेळचं संघर्ष, आंदोलन, रस्त्यावर उतरून अन्याया विरुद्ध लढणं, खडतर प्रवास या सर्व गोष्टी आहेत. सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर असं सगळेच म्हणायचे. कॉमन मॅन म्हणा ना.. काय प्रॉब्लेम आहे.. चीफ मिनिस्टर म्हटल्यावर काहीतरी वेगळं दिसतं का?' 

'तुम्ही मुख्यमंत्री झालात, तर तुमची नाळ कायम सामान्य माणसाशी जोडली पाहिजे. माणूस कोणत्याही पदावर गेला, तर त्याच्या डोक्यात हवा जाता कामा नये. सामान्य माणूस म्हणूनच काम केलं पाहिजे. मी मुख्यमंत्री होतो, तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं. उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहेत. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत. आमची टीम तीच आहे. आता डीसीएम आहे मी.'

हे ही वाचा>> Shashikant Shinde Mumbai Tak Baithak 2025: 'हिटलरशाही लवकरच संपणार', निलेश लंकेंनी थेट साधला निशाणा.. हिंदुत्वावरही बेधडक बोलले!

'तुम्ही म्हणाल डेडिकेटेड टू कॉमन मॅन.. काय प्रॉब्लेम आहे. सर्वसामान्य माणूस तर आपल्याला मोठा करतो. जे काम करायचं ते मनापासून करायचं. म्हणून तर या राज्यात आपण अडीच वर्षाचा प्रवास पाहिला. खडतर प्रवास झाला तरी मला चिंता नाही. अडीच वर्षाच्या प्रवासात जी कामं झाली, आपण त्याचे साक्षीदार आहात. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आपण काम केलं पाहिजे. सर्वसामान्य माणसांसाठी आपण विकासकामे करतो.' असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी ते अद्यापही कार्यकर्ता म्हणून काम करत असल्याचं सांगितलं. 

प्रश्न: आर.आर पाटील यांचं शेवटचं भाषण होतं. नंबर एकच पद असतं.. ते म्हणजे मुख्यमंत्री.  त्यापुढच्या नंबरची अशी कोणती पदच नसतात. तुम्हाला असं वाटतं का? तुम्ही पण त्या मताशी सहमत आहात का? 

एकनाथ शिंदे: प्रत्येकाचा अनुभव आणि विचार वेगवेगळे असतात. जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा माझ्यासोबत देवेंद्र फडणवीस, अजितदादा होते. देवेंद्रजींना मी कधीही उपमुख्यमंत्री समजलो नाही. मी त्यांना माझ्यासोबत मुख्यमंत्रीच समजलो. आम्ही टीम म्हणून काम केलं. त्यामध्ये छोटा-मोठा काही नाही. तुम्ही जेव्हा टीम वर्क करता, तेव्हा तुम्हाला कोणत्याही अडचणी येत नाहीत. मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वसामान्य माणसाला न्याय देणं, हा अजेंडा आहे.हा अजेंडा आम्ही ठेवला. त्यामुळे आमच्या टीममध्ये काहीही अडचण नाहीय.खुर्चीसाठी आम्ही कधीच कासावीस झालो नाही.

हे ही वाचा>> Balasaheb Thorat Mumbai Tak Baithak 2025: "महायुद्ध जिंकल्यावर चर्चिलचं सुद्धा..", बाळासाहेब थोरात विधानसभेच्या पराभवावर खुलेपणाने बोलले!

प्रश्न: कोणत्या ना कोणत्या पद्धतीत एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं जातं? अशा बातम्या येतात. शिंदें यांनाच मुख्यमंत्रिपदाचा मान मिळणार होता, पण तो नंबर गेम बिघडल्यामुळे तो हातातून गेला. 137 जागा जर भारतीय जनता पक्षाच्या आल्या नसत्या, तर शिंदेच मुख्यमंत्री झाले असते, हे मनात कुठेतरी येतं का? 

एकनाथ शिंदे: माझ्या मनात नाहीय. देवेंद्रजींच्या मनात नाहीय. माध्यमं सर्व परसेप्शन तयार करता. आमचं सर्वकाही चांगलं चाललंय.

प्रश्न: तुम्ही लाडकी बहीण योजना आणली. लाडका भाऊ म्हणून तुमची प्रतिमा तयार झाली. ती योजना कशी लागू होणार? अशी अनेकांना शंका होती. त्या योजनेचे आर्थिक परिणाम काय होणार? असे अनेक प्रश्न होते. तुम्ही टीकाही सहन केल्या. त्यानंतर असं वाटत होतं की, निवडणुकीनंतर पुन्हा एकनाथ शिंदेंना चान्स मिळेल. पण तसं झालं नाही. कारण भारतीय जनता पक्षाला 137 जागा मिळाल्या. नंबर गेमचा फरक पडला, असं तुम्हाला वाटतं का?
  
एकनाथा शिंदे: आमची युती स्वार्थासाठी झाली नाही. बाळासाहेबांनी ही युती केलेली आहे. नंबर गेमवर आमची युती नाहीय. आमच्या विचारधारेवर आहे. आमची विचारधारा एक आहे. 2019 ला नंबर गेम झाला. नंबर गेमचं महत्त्व 2019 ला समजलं. 2022 ला सर्वसामान्य माणसांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं. त्या कामाच्या जोरावरच एवढ्या जागा आल्या. टीम म्हणून आम्ही काम केलं. राज्याचा विकास आम्हाला महत्त्वाचा आहे. असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp