7 तास विवस्त्र अवस्थेत; शारीरिक संबंधांनंतर गमावला जीव पण प्रियकराने शेवटी....

मुंबई तक

उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात प्रेमसंबंधांतून एका तरुणीला तिच्या प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवणे महागात पडलं आहे. एका रात्रीत तिने आपल्या प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवल्यामुळे तिला आपला जीव गमवावा लागला.

ADVERTISEMENT

7 तास विवस्त्र अवस्थेत; शारीरिक संबंधांनंतर गमावला जीव
7 तास विवस्त्र अवस्थेत; शारीरिक संबंधांनंतर गमावला जीव
social share
google news

बातम्या हायलाइट

point

7 तासात 2 वेळा शारीरिक संंबंध

point

शारीरिक संबंधांनंतर तरुणीने गमावला जीव

Crime News: उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात प्रेमसंबंधांतून धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. एका तरुणीला तिच्या प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवणे महागात पडलं आहे. एका रात्रीत तिने आपल्या प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवल्यामुळे तिला आपला जीव गमवावा लागला. नेमकं काय घडलं?

घरात कोणीच नसताना घडला प्रकार 

ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील कानपूर जिल्ह्यामधील शिवराजपूर पोलीस स्टेशन परिसरात घडली. प्रकरणातील पीडित तरुणी या परिसरात राहायला होती. तिचे कुलदीप कुमार नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. प्रियकर हा नेवाडा गावाचा रहिवासी असून तरुणीच्या गावापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर त्याचं गाव होतं.

एके दिवशी तिचे घरातील सदस्य कुटुंबातील लग्न समारंभासाठी बाहेर गेले होते. त्या दिवशी तरुणीने आपल्या प्रियकराला ती घरी एकटीच असल्याचं सांगितलं. घरात एकटी असल्यामुळे तिने कुलदीपला आपल्या घरी बोलावलं आणि प्रेयसीने बोलवल्यामुळे कुलदीप तिच्या घरी गेला.

हे ही वाचा: गोपीचंद पडळकरांच्या समोरच नितीन देशमुखांना मारहाण झाली, 'तो' Inside Video आला समोर

7 तासात 2 वेळा शारीरिक संबंध 

त्या दिवशी संपूर्ण रात्र तरुणीने आपल्या प्रियकरासोबत घालवली. त्यावेळी कुलदीपने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. इतकेच नव्हे तर शारीरिक संबंध ठेवताना प्रियकराने शक्ती वाढवण्याच्या गोळ्या देखील घेतल्या होत्या. 2 वेळा कुलदीपने आपल्या प्रेयसीसोबत संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, तरुणी ही सुमारे 7 तास विवस्त्र अवस्थेत असल्याचं सांगितलं जात आहे. इतका काळ अशा अवस्थेत असल्यामुळे तिला थंडी वाजू लागली आणि तिची तब्येत बिघडत गेली. प्रेयसीची तब्येत खालावत असल्याचं पाहून कुलदीप घाबरला आणि तो तिथून पळून गेला. बराच काळ विवस्त्र अवस्थेत असल्यामुळे तरुणीची तब्येत बिघडली आणि तिथेच तिचा मृत्यू झाला.

हे ही वाचा: विवाहित शिक्षिका 'यासाठी' 16 वर्षांच्या मुलासोबत ठेवायची शरीरसंबंध? 'तो' अहवाल आला समोर!

पोलिसांनी केला तपास 

तरुणीचे कुटुंबीय लग्न समारंभाहून सकाळी घरी परतले. त्यावेळी ते आपल्या मुलीच्या खोलीत गेले आणि तिथे आपल्या मुलीचा अर्धनग्न अवस्थेत असलेला मृतदेह पाहून त्यांना खूप मोठा धक्का बसला. मिळालेल्या माहितीनुसार, त्या रात्री तरुणीची भाची देखील तरुणीसोबत तिच्या घरी होती. कुटुंबियांनी तातडीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलीस लगेच घटनास्थळी पोहचले आणि फॉरेन्सिक टीमने सुद्धा मुलीच्या घरी पोहचून पुरावे शोधले. त्या रात्री तरुणीचा प्रियकर घरी आल्याची माहिती मुलीच्या भाचीने पोलिसांना दिली. या माहितीवरून पोलिसांनी प्रियकर म्हणजेच कुलदीपला ताब्यात घेतलं. त्यावेळी प्रेयसी घरी एकटी असल्यामुळे तो तिच्या घरी गेला आणि रात्रभर तिथेच थांबला असल्याचं प्रियकराने पोलीस चौकशीदरम्यान सांगितलं. रात्री अचानक तरुणीची तब्येत बिघडल्यामुळे तो तिथून पळून गेल्याचंही त्याने पोलिसांना सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp