मुंबईतील लग्न झालेली शिक्षिका 'यासाठी' 16 वर्षांच्या मुलासोबत ठेवायची शरीरसंबंध? 'तो' रिुपोर्ट आला समोर!
Mumbai Crime News: एका शिक्षिकेने तिच्या विद्यार्थ्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचं मुंबईतील प्रकरण हे काही दिवसांपूर्वी उघडकीस आलं होतं. मात्र, प्रौढ वयाच्या महिला या अत्यंत कमी वयाच्या मुलांसोबत असं कृत्य का करतात याबाबत एक अहवाल हा आता समोर आला आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेत इंग्रजी शिकवणाऱ्या एका महिला शिक्षिकेने 16 वर्षांच्या विद्यार्थ्याचे सुमारे एक वर्ष लैंगिक शोषण केल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. महिला शिक्षिका ही मुलाला मुंबईतील एकांत असलेल्या ठिकाणी तसेच आलिशान पंचतारांकित हॉटेल्समध्ये घेऊन जायची, जिथे तिने त्याला मद्यपान करून त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवायची. आरोपी शिक्षिका ही 40 वर्षांची आहे. ती विवाहित आहे आणि तिला दोन मुले आहेत.
दरम्यान, तिने अल्पवयीन मुलासोबत असं का केलं हा प्रश्न सातत्याने चर्चेत येत आहे? काही दिवसांपूर्वीच न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान पोलिसांनी मानसिक चाचण्या करण्यासाठी कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. यावेळी न्यायालयानेही शिक्षिकेची मानसिक चाचणी घेणे आवश्यक असल्याचे मान्य केले होते.
पालकांनीही मोठी चूक केली, मुलगा नैराश्यात
अल्पवयीन विद्यार्थ्याच्या लैंगिक शोषणाचा आणखी एक पैलू आहे. शिक्षिका बराच काळ मुलासोबत चुकीचे कृत्य करत होती. सततच्या अत्याचारानंतर मुलाचे वर्तन बदलले, जे पालकांच्या लक्षात आले. पण सुरुवातीला त्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिले नव्हते. पण नंतर ते जेव्हा आपल्या मुलाशी बोलले तेव्हा शिक्षिकेचे दुष्कृत्य उघडकीस आले.
हे ही वाचा>> 'त्या' महिला नेमक्या कोण ज्या हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्यांसोबत करायच्या नको ते...
यानंतरही पालकांनी कोणतीही मोठी कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. कारण तो बारावीच्या बोर्ड परीक्षेनंतर कॉलेज सोडणार होता. मुलाच्या पालकांची ही पहिली चूक होती. त्यांना वाटले की, बोर्डाच्या परीक्षेनंतर अल्पवयीन मुलाला त्या व्यभिचारी शिक्षिकेपासून मुक्तता मिळेल. यावेळी त्यांना मुलाच्या परीक्षेची काळजी होती.










