Mumbai Tak /बातम्या / Family Man 3 : “फॅमिली के साथ आ रहा हूँ…;” मनोज वाजपेयीकडून सरप्राईज
बातम्या बॉलिवूड मनोरंजन

Family Man 3 : “फॅमिली के साथ आ रहा हूँ…;” मनोज वाजपेयीकडून सरप्राईज

Manoj Bajpayee | The Family Man 3 : 

हिंदी चित्रपटसृष्टीतील काही दमदार अभिनेत्यांबद्दल बोलायचं झाल्यास यात मनोज वाजपेयीचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागतं. मनोज वायपेयीने त्याच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक उत्तम चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आणि यापैकीच एक सर्वोत्कृष्ट वेब सिरीज म्हणजे ‘द फॅमिली मॅन’. (Manoj Bajpayee led The Family Man 3’s release date is finally out)

फॅमिली मॅनचा पहिला आणि दुसरा सीझन सुपर-डूपर हिट ठरला होता. त्यानंतर चाहते या वेब सिरीजच्या तिसऱ्या सीझनची वाट बघतं होते. आता याबाबत मनोज वाजपेयीने एक व्हीडिओ शेअर करुन माहिती दिली आहे. “Family” ke saath aa raha hoon…swagat nahin karoge humara?, असं कॅप्शन या व्हीडिओला दिलं आहे. मनोज वाजपेयींच्या या लेटेस्ट व्हीडिओने चाहत्यांची उत्सुकता द्विगुणित केली आहे.

व्हीडिओमध्ये काय आहे?

‘खूप दिवस झाले ना?, माझं लक्षपूर्वक ऐका, या होळीला मी तुमच्या फॅमिलीसाठी येतोय, माझ्या फॅमिलीला घेऊन. तयार रहा.

होळीला येणार तिसरा सीझन?

अवघ्या १८ सेकंदाच्या या व्हीडिओमधून मनोज वाजपेयीने ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या सीझनची घोषणा केली का? या चर्चांना सुरुवात झाली आहे. हा बहुप्रतिक्षीत तिसरा सीझन या होळीला प्रदर्शित होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

याआधी, ‘द फॅमिली मॅन’चे दोन्ही सीझन Amazon Prime Video या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले होते. या दोन्ही सीझनमध्ये मनोज वायपेयी, शारीब हाश्मी, प्रियामणी, श्रेया धन्वंतरी आणि शरद केळकर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. तर दुसऱ्या सीझनमध्ये समंथा रुथ प्रभूनं प्रमुख भूमिका साकारली होती. हे दोन्ही सीझन सुपरहिट ठरले होते. मनोज वायपेयीची ‘श्रीकांत तिवारी’ ही भूमिका चाहत्यांना भावली होती.

---------
Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते? मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री… एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना