Amitabh Bachchan: कुलीच्या सेटवर झाले घायाळ ते हात जळण्यापर्यंत… बिग बींचे अनेकदा झाले अपघात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Amitabh bachchan injury: बॉलीवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) हैदराबादमध्ये शूटिंगदरम्यान जखमी झाले आहेत. अॅक्शन सीनच्या शूटिंगदरम्यान बिग बींना दुखापत (Injury) झाली. याविषयी बिग बींनी सांगितले की, प्रोजेक्टच्या शूटिंगदरम्यान ते जखमी झाले. बिग बींच्या बरगडीला दुखापत झाली आहे. त्यांनी सांगितले की रिब कार्टिलेज पॉप झाला आहे आणि उजव्या बरगडीच्या पिंजऱ्याचा बाजूचा स्नायू फाटला आहे. अपघातानंतर शूटिंग थांबवण्यात आली आहे. हैदराबादच्या एआयजी हॉस्पिटलमध्ये बिग बींचे सीटी स्कॅन करण्यात आले. डॉक्टरांनी बिग बींना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. From getting injured on the sets of Coolie to burning his hands… amitabh Bachchan has had many accidents

ADVERTISEMENT

बिग बींना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या जलसा येथील घरी विश्रांती घेत आहेत. बॉलीवूडच्या सुपरस्टारचा शूटिंगदरम्यान अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही शुटिंगदरम्यान बिग बीला अनेकदा दुखापत झाली आहे आणि प्रत्येक वेळी ते दुप्पट उत्साहाने कामावर परतले आहेत. बॉलीवूडच्या महानायकाच्या अनेकदा अपघाताला बळी पडावे लागले आहे.

पायाची नस कापली गेली

2022 मध्ये अमिताभ बच्चनसोबत ‘कौन बनेगा करोडपती 14’ च्या सेटवर अपघात झाला होता. बिग बींच्या चुकीमुळे त्यांच्या पायाची नस कापली गेली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये या घटनेचा उल्लेख केला होता. बुटातील धातूचा तुकडा पडल्याने पायाची नस कापल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांनी सांगितले की, जेव्हा सतत रक्तस्त्राव सुरू होता तेव्हा तातडीने वैद्यकीय पथकाची मदत घेण्यात आली. वेळीच उपचार मिळाल्याने बिग बी बरे झाले. त्यांच्या पायाला काही टाके घालावे लागले. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर बिग बींनी जोरदार पुनरागमन केलं होतं.

हे वाचलं का?

अमिताभ बच्चन Project K शूटिंगदरम्यान दुखापत; श्वास घ्यायला होतोय त्रास

कुलीच्या सेटवरची घटना

कुली या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बिग बींचा मोठा अपघात झाला होता. या घटनेने बॉलिवूड हादरले. एका सीनच्या शूटिंगदरम्यान पुनीत इस्सार यांना अमिताभ बच्चन यांच्या चेहऱ्यावर ठोसा मारायचा होता आणि त्यांना टेबलावर पडायचे होते. पण जेव्हा पुनितने बिग बींना टेबलावर आदळले तेंव्हा ते गंभीर जखमी झाले. बिग बी 2 महिने रुग्णालयात दाखल होते. या अपघातात अमिताभ बच्चन यांना नवसंजीवनी मिळाली.

ADVERTISEMENT

अमिताभ बच्चन यांना केबीसीत रडू कोसळलं; जया आणि अभिषेक बच्चननं सावरलं

ADVERTISEMENT

26 जुलै 1982 रोजी बिग यांना दुखापत झाली. मात्र सुरुवातीला ही किरकोळ दुखापत लक्षात घेऊन डॉक्टरांनी ती गांभीर्याने घेतली नाही. हळूहळू संसर्ग पसरू लागला. चौथ्या दिवशी बिग बींची प्रकृती ढासळू लागली. त्यांना पुन्हा पुन्हा उलट्या होत होत्या. यानंतर ते कोमात गेले. डॉक्टरांनी ऑपरेशन केले असता पोटाचा पडदा फाटल्याचे दिसून आले. लहान आतडेही फाटले होते. ऑपरेशन झाले तेव्हा बिग बींना न्यूमोनिया झाला.

29 जुलै रोजी त्यांची प्रकृती बिघडली. 31 जुलै रोजी बिग बींना मुंबईत आणून ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 2 ऑगस्ट रोजी त्यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली. तीन दिवसांनी बिग बींच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. हळूहळू त्यांची प्रकृती बरी होऊ लागली. 24 सप्टेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

अमिताभ बच्चन यांचा आज 80 वा वाढदिवस; आयुष्यातील 8 टर्निंग पॉईंट ज्यांनी त्यांना ‘महानायक’ बनवलं

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT