Salman khan : मुंबई हादरली! सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Firing outside Salman Khan's House : बॉलिवूडचा (Bollywood) दबंग अभिनेता सलमान खानला (Salman Khan) अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या धमक्यांनंतर सलमान खानच्या अवतीभोवती नेहमीच कडक सुरक्षा असते. परंतु कडक सुरक्षा असूनही, पहाटे 4.50 वाजता, दोन अज्ञात व्यक्तींनी अभिनेत्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर अनेक राऊंड गोळीबार केला, त्यानंतर मुंबईसह देशभरात खळबळ उडाली आहे. 

सलमानच्या घराबाहेर गोळीबार

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 4.50 वाजता वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दोन अज्ञात लोकांनी हवेत तीन ते चार राऊंड गोळीबार केला. हे कृत करणारे दोन आरोपी बाईकवर आले आणि नंतर हवेत गोळीबार करून तेथून त्यांनी पळ काढला. दोघांनी हेल्मेट घातले होते, त्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी फॉरेन्सिक टीमही सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचली आहे.

सलमानच्या सुरक्षेत आणखी वाढ!

गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार कोणी केला हे अद्याप कळू शकलेलं नाहीये. तपास केला जात आहे, मात्र सलमान खानला असलेला धोका लक्षात घेता त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सलमानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या

बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर अशा प्रकारे गोळीबार झाल्याची बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सलमानच्या सुरक्षेची सगळ्यांनाच चिंता आहे, कारण गेल्या अनेक वर्षांपासून सलमानला गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई या गुंडांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याआधीही सलमानवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबाराची घटना गंभीर आहे.

सलमानच्या घराबाहेर 24 तास पोलिसांचा कडक बंदोबस्त

तीन वर्षांपूर्वी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्याकडून धमकीचे पत्र मिळाल्यानंतर, सलमान खानला मुंबई पोलिसांनी सर्व शस्त्रे आणि सुरक्षा कर्मचारी दिले आहेत. सलमानला वैयक्तिक शस्त्र परवाना देखील देण्यात आला आहे, जेणेकरून तो त्याच्या संरक्षणासाठी वैयक्तिक शस्त्रे ठेवू शकेल. त्याच्या घराभोवती तीन शिफ्टमध्ये 24 तास कडेकोट पोलीस बंदोबस्त असतो.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT