कंगनामुळे हृतिक पुन्हा एकदा अडचणीत - Mumbai Tak - hrithik is in trouble again because of kangana - MumbaiTAK
मनोरंजन

कंगनामुळे हृतिक पुन्हा एकदा अडचणीत

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनला अभिनेत्री कंगना रणौत प्रकरणादरम्यान समन्स बजावण्यात आला आहे. सीआययुतर्फे म्हणजेच गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकातर्फे हा समन्स बजावण्यात आलाय. यानुसार येत्या हृतिकला 27 फेब्रुवारी रोजी म्हणजेच उद्या जबाब नोंदवण्यासाठी हजर रहावं लागणार आहे. कंगना आणि हृतिक यांच्यात झालेल्या ईमेल्सच्या वादावरून हृतिकची चौकशी केली जाणार आहे. 2016 साली हृतिककडून तक्रार दाखल करण्यात आली होती […]

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनला अभिनेत्री कंगना रणौत प्रकरणादरम्यान समन्स बजावण्यात आला आहे. सीआययुतर्फे म्हणजेच गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकातर्फे हा समन्स बजावण्यात आलाय. यानुसार येत्या हृतिकला 27 फेब्रुवारी रोजी म्हणजेच उद्या जबाब नोंदवण्यासाठी हजर रहावं लागणार आहे. कंगना आणि हृतिक यांच्यात झालेल्या ईमेल्सच्या वादावरून हृतिकची चौकशी केली जाणार आहे.

2016 साली हृतिककडून तक्रार दाखल करण्यात आली होती ज्यामध्ये, त्याच्या नावाने फेक आयडी तयार करून कंगनाशी संवाद साधला असल्याचं म्हटलं होतं. तर दुसरीकडे कंगनाने हृतिक आपल्याला सतत इमेल पाठवून त्रास देत असल्याचा आरोप केला होता. यावर हृतिकने आपण कंगनाला कोणतेही इमेल पाठवले नसल्याचा खुलासाही केला होता.

हृतिकने याबाबत मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार केली होती. ही केस आता सायबर सेलकडून सीआययुकडे ट्रान्सफर करण्यात आलीये. आता हृतिक रोशन याच्या तक्रारीचा नव्याने तपास सुरु झाला आहे. यासाठीच हृतिकला त्याचा सविस्तर जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आहे.

ह्रतिक आणि कंगनाने 2013 मध्ये क्रिश 3 सिनेमात सोबत काम केलं होतं. शिवाय एका इंटरव्यू दरम्यान बोलताना कंगनाने ह्रतिकचा उल्लेख ‘सिली एक्स’ असा केला होता. यानंतर ह्रतिकने कंगनाला कायदेशीर नोटीसही पाठवली होती. तसंच ह्रतिकने त्याच्यात आणि कंगनामध्ये अफेअर नसल्याचं म्हटलं होतं. कायदेशीर नोटीस पाठवत सार्वजनिकपणे माफी मागावी अशी मागणीही हृतिकने केली. यावर कंगनाने माफी मागण्यास नकार दिला. तसंच 2014 मध्ये आमचं अफेअर असल्याचा असा दावाही कंगनाने केला. कंगनाने ह्रतिकला नोटीस पाठवली आणि आपण पाठवलेली नोटीस मागे असा इशाराही दिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four + nineteen =

शरीरातील 7 ठिकाणी वेदना जाणवल्या तर समजा… जान्हवीसोबत ओरी… ‘या’ लुकसाठी खर्च केले ‘एवढे’ लाख! इम्रानसोबतच्या किसिंग सीनबाबत तनुश्री दत्ताचा मोठा खुलासा शमीची पत्नी हसीन जहाँला चीअर लीडर म्हणून एवढा होता पगार! मुलाच्या जन्मानंतर IAS टीना दाबी खूपच बदलली, फोटो व्हायरल बॉबीने Animal मध्ये नाना पाटेकरची केली कॉपी? ‘हा’ व्हिडिओ पाहिल्यानंतर.. Ritu Suhas: ग्लॅमरस IAS अधिकारी, रॅम्पवर जलवा UPSC मुलाखतीत सर्वाधिक विचारले जातात ‘हे’ प्रश्न पोटाची चरबी 15 दिवसात होईल कमी, फक्त ‘या’ बिया खा अन् पाहा कमाल! तेजस्वीचा 9 वर्षांनी मोठ्या बॉयफ्रेंडसोबत सर्वांसमोरच liplock kiss तुम्ही मानसिकदृष्ट्या वृद्ध बनत आहात का..? ‘या’ गोष्टीमुळे शांत झोप कधीच नाही लागणार ‘या’ लोकांनी चुकूनही दूध पिऊ नये… मराठी सिनेसृष्टीत येतोय नवा चेहरा; जिच्या रूपाची आधीपासूनच का आहे एवढी चर्चा? भारतातील 8 सर्वात तरुण महिला IAS अधिकारी; तुम्हाला किती माहितीयेत? Apurva Nemlekar: अपूर्वाचा स्विमिंग पूलमध्ये ‘खेळ चाले…’ मादक अदा अन्… ह्रतिक रोशन-दीपिका पदुकोणचा Fighter मध्ये रोमान्स, बघा Video UPSC: अभिनेत्री नाही.. तर ही आहे मोठी अधिकारी, सगळेच करतात सॅल्यूट! Belly Fat: सकाळी उठल्यानंतर ‘या’ 8 गोष्टी करून वाढलेलं पोट करा कमी! IAS अधिकारी व्हायचंय? मग ‘या’ Top 7 गोष्टींची सवय असलीच पाहिजे