काँग्रेसला रामराम… राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच अभिनेत्री आसावरी जोशी म्हणाल्या…

मुंबई तक

मुंबई: मराठमोळी अभिनेत्री आसावरी जोशी (Asawari Joshi) आणि अभिनेत्री स्वागता शाह यांनी आज (7 एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश कार्यक्रम मुंबईत पार पडला. आसावरी जोशी हे मराठी चित्रपटसृष्टीतील मोठं नाव आहे. अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: मराठमोळी अभिनेत्री आसावरी जोशी (Asawari Joshi) आणि अभिनेत्री स्वागता शाह यांनी आज (7 एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश कार्यक्रम मुंबईत पार पडला.

आसावरी जोशी हे मराठी चित्रपटसृष्टीतील मोठं नाव आहे. अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. पण आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन नव्याने राजकारणाला सुरुवात केली आहे.

खरं तर आसावरी जोशी या मागील तीन वर्षापासून काँग्रेसशी संबंधित होत्या पण आता त्यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आसावरी जोशी यांनी गुरुवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काय म्हणाल्या आसावरी जोशी?

हे वाचलं का?

    follow whatsapp