एग्जिट पोल

Bigg Boss Marathi: 'हा' सदस्य बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार? निक्की, जान्हवी Runner Up; कोण ठरणार विजेता?

मुंबई तक

ADVERTISEMENT

bigg boss marathi season 5 winner viral bigg boss list prize money 25 lakh
बिग बॉस मराठीचा 5 वा सीझन हा 100 दिवसांऐवजी 70 दिवसात गुंडाळला जाणार आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बिग बॉस मराठीचा विजेता ठरला

point

'हा' सदस्य बिग बॉसची ट्रॉफी उंचावणार

point

जिंकणाऱ्याला सदस्यादा किती प्राईज मनी मिळणार?

Bigg Boss Marathi 5 Winner list Viral : बिग बॉस मराठीचा 5 वा सीझन हा 100 दिवसांऐवजी 70 दिवसात गुंडाळला जाणार आहे. खरं तर यंदाचा सीझन हा प्रचंड गाजला आहे, तरी देखील तो लवकरच बंद करण्यात येणार असल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी आहे. या दरम्यानच आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची विनर लिस्ट व्हायरल  झाली आहे.  या व्हायरल लिस्टमध्ये बिग बॉस मराठी 5 चा विजेता कोण ठरणार? कोणते सदस्य रनरअप ठरणार आहेत? हे जाणून घेऊयात. (bigg boss marathi season 5 winner viral bigg boss list prize money 25 lakh) 

बिग बॉस मराठीच्या घरात सध्या वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, पंढरीनाथ कांबळे, धनंजय पोवार आणि अभिजीत सावंत हे सदस्य आहेत. या आठ सदस्यांपैकी विजेता कोण असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. असे असतानाच सोशल मीडियीवर बिग बॉस मराठीची विनर लिस्ट व्हायरल झाली आहे. या लिस्टमध्ये विजेत्याचे नाव सांगण्यात आले आहे. 

हे ही वाचा : India Today Conclave 2024 : पंतप्रधान पदाची कुणी दिली ऑफर..., गडकरींनी काय सांगितलं?

व्हायरल लिस्टनुसार आठ सदस्यांपैकी वर्षा उसगांकर, पंढरीनाथ कांबळे, धनंजय पवार यांचे एलिमिनेश होणार आहे. तर निक्की, जान्हवी, अंकिता,सूरज आणि अभिजीत सावंत हे सदस्य टॉप 5 मध्ये पोहोचणार आहेत. तर निक्की तांबोळी चौथी रनर-अप असेल, जान्हवी तिसरी रनर-अप असेल, सूरज तिसऱ्या क्रमांकावर असेल. अंकिता व अभिजीतमध्ये शेवटच्या क्षणी टक्कर होते आणि त्यामध्ये गायक अभिजीत सावंत विजेता ठरतो.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. पण त्यापूर्वी सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्याने विजेता आधीच ठरल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

हे ही वाचा : Exclusive: 'माझा एन्काउंटरवर विश्वास नाही, पण...', अक्षय शिंदे चकमकीवर फडणवीसांचं मोठं विधान

विजेत्या सदस्यांना 'इतके' लाख मिळणार

या स्पर्धेचा 60वा एपिसोड २५ सप्टेंबर रोजी प्रसारित होईल. त्याआधी कलर्स मराठीने एक प्रोमो प्रसारित केला, सोशल मीडियावरही आगामी एपिसोडचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉस असे जाहीर करतात की, 'बिग बॉस मराठीच्या या सीझनच्या विजेत्याला मिळणारी बक्षीसाची रक्कम आहे, 25 लाख रुपये... ही प्राइज मनी कमावण्यासाठी मी आणला आहे या सीझनमधील सर्व टास्कचा बाप- महाचक्रव्यूह!' बिग बॉसने या टास्कविषयी जाहीर करताच सर्वांच्याच चेहऱ्यावरील रंग उडाला. शिवाय घरामध्ये एक महाचक्रव्यूह रचण्यात आल्याचेही दिसते आहे. आता हा 'टास्कचा बाप' काय असणार हे आगामी एपिसोडमध्ये पाहायला मिळेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT