राज कुंद्राला जामीन मिळाल्यानंतर शिल्पा शेट्टीची पहिली पोस्ट चर्चेत

मुंबई तक

पॉर्न चित्रपटाच्या निर्मिती प्रकरणात अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राला अखेर जामीन मिळाला. त्यामुळे राज कुंद्राला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राज कुंद्राला जामीन मिळाल्यानंतर शिल्पा शेट्टीनं केलेल्या पोस्टचीही चर्चा होत आहे. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने पॉर्न चित्रपट बनवून विविध प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला १९ जुलै रोजी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

पॉर्न चित्रपटाच्या निर्मिती प्रकरणात अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राला अखेर जामीन मिळाला. त्यामुळे राज कुंद्राला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राज कुंद्राला जामीन मिळाल्यानंतर शिल्पा शेट्टीनं केलेल्या पोस्टचीही चर्चा होत आहे.

मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने पॉर्न चित्रपट बनवून विविध प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला १९ जुलै रोजी अटक केली होती. राज कुंद्राविरोधात पुरावे मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. अटक झाल्यापासून राज कुंद्राकडून जामीनासाठी प्रयत्न केले जात होते.

अखेर राज कुंद्राला न्यायालयाकडून दिलासा मिळाला. सोमवारी मेट्रोलपोलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालयाने राज कुंद्राला ५० हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्याचबरोबर स्थानिक पोलिसांना माहिती दिल्याशिवाय राज कुंद्राना शहर सोडता येणार नाही, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. राज कुंद्राबरोबरच त्यांचा आयटी हेड रायन थार्पलाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Pornography case : राज कुंद्राची अखेर तुरूंगातून सुटका! न्यायालयालयाकडून मोठा दिलासा

हे वाचलं का?