रंग माझा वेगळा मालिकेत येणार नवा ट्विस्ट, कार्तिकने नाकारला स्वत:च्या मुलीला त्याचं नाव देण्याचा अधिकार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. दीपाने दोन जुळ्या मुलींना जन्म दिलाय खरा पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच आहे. जन्मानंतर दीपाचं एक बाळ तिच्यापासून दूर झालंय. तर दुसऱ्या बाळाचं पितृत्वच तिच्या वडिलांनी म्हणजेच कार्तिकने नाकारलं आहे. त्यामुळे दीपाने आता माझी मुलगी वडिलांच्या नावाची भीक मागणार नाही असं ठमकावून सांगत एकटीने मुलीला वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.दीपा-कार्तिकच्या नात्यातली कटुता मुलींच्या जन्मानंतर तरी दूर होईल असं वाटत होतं. सौंदर्याने पुढाकार घेत या दोघांमधले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर दीपाची एक मुलगी आपल्या घरात आणून कार्तिकचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती बदलण्याचं नाव घेत नाहीय. त्यामुळे दीपा-कार्तिक आणि त्यांच्या मुलींच्या नात्याचं भवितव्य नेमकं काय असणार याची उत्सुकता आता वाढली आहे.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT