हेलिकॉप्टर खोल दरीत कोसळलं, मुंबईतील चार प्रवाशांसह 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू!
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगानानी परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या अपघातात मृत पावलेल्या प्रवाशांमध्ये मुंबईतील 4 प्रवाशांचा देखील समावेश होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
हेलिकॉप्टर अपघातात मुंबईतील चार प्रवाशांचा मृत्यू
उत्तराखंडमधील हेलिकॉप्टर अपघातात 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात हेलिकॉप्टर खोल दरीत कोसळलं
Uttarakhand News: उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगानानी परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हॅलिकॉप्टरमध्ये एकूण सात प्रवासी होते आणि त्यातील 6 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या प्रवाशांमध्ये मुंबईतील 4 प्रवाशांचा देखील समावेश होता. आता मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या अपघाताची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
सूचना मिळताच बचावकार्याला सुरूवात
सध्या उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा सुरू आहे. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर कोणाचे होते? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.
हेलिकॉप्टरमध्ये 7 प्रवाशांचा समावेश
मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण 7 प्रवासी होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या अपघातात गुजरातचे रहिवासी असलेले 30 वर्षीय पायलट कॅप्टन रॉबिन सिंग यांच्यासह 6 प्रवाशांचा मृत्यू झाला. जखमी प्रवाशाला उपचारासाठी ऋषिकेशच्या एम्समध्ये नेण्यात आले आहे.
हेलिकॉप्टरमधील चार प्रवासी मुंबईचे आणि दोन आंध्र प्रदेशचे होते. ते अपघाताची माहिती मिळताच SDRF, सैन्य आणि पोलिसांचे जवान घटनास्थळी पोहोचले.
