NHDC मध्ये 'या' पदांसाठी बंपर भरती; तगडा पगार मिळेल, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

मुंबई तक

नॅशनल हॅन्डलूम डेव्हलपमेंट कॉरपोरेशन लिमिटेड (NHDC) कडून देशभरात विविध कार्यालयांसाठी जूनियर ऑफिसरच्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जाणून घ्या, कोणत्या पदांसाठी निघाली भरती?

ADVERTISEMENT

NHDC मध्ये 'या' पदांसाठी बंपर भरती; तगडा पगार मिळेल
NHDC मध्ये 'या' पदांसाठी बंपर भरती; तगडा पगार मिळेल
social share
google news

बातम्या हायलाइट

point

NHDC कडून ज्यूनियर ऑफिसरच्या पदांसाठी भरती

point

NHDC च्या कोणत्या पदांसाठी निघाली भरती?

point

भरतीसाठी कधी आणि कुठे कराल अर्ज?

NHDC recruitment 2025: नॅशनल हॅन्डलूम डेव्हलपमेंट कॉरपोरेशन लिमिटेड (NHDC) कडून देशभरात विविध कार्यालयांसाठी जूनियर ऑफिसरच्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Regular Employment Basis वर करण्यात येत आहे. यासाठी इच्छुक उमेदवार 24 मे 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात.

NHDC हा वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असून तो देशातील हातमाग क्षेत्राच्या जलद वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. ही संस्था कच्च्या मालाचा पुरवठा, तांत्रिक सुधारणा आणि उत्पादन वाढवण्यासाठी राज्य सरकारसोबत मिळून काम करते.

भरतीसंबंधी माहिती

जाहिरात क्रमांक: NHDC/HR/DR/2025/4
पद: जूनियर ऑफिसर
एकूण पदे: 08 ( 06 अनारक्षित, 01 अनुसूचित जमाती, 01 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक)
पद कोड: JO/DR/25/4/01
कुठे होणार नियुक्ती?: भारतातील NHDC ची विविध कार्यालये

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

ज्यूनियर ऑफिसर पदासाठी उमेदवाराला मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे अनिवार्य आहे. यासोबतच इंग्रजी टायपिंगमध्ये प्रति मिनिट 40 शब्दांचा वेग आवश्यक आहे. उमेदवाराला कंप्यूटरच्या कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे, विशेषतः एमएस ऑफिस आणि इंटरनेट वापरण्यात प्रवीणता असणं गरजेचं आहे. हिंदी टायपिंगचे ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. याव्यतिरिक्त, उमेदवाराला सरकारी विभाग, सार्वजनिक क्षेत्र किंवा कोणत्याही प्रतिष्ठित खाजगी क्षेत्रात टायपिंगशी संबंधित कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

हे ही वाचा: 8th May Gold Rate : मोहिनी एकादशीला सोन्याचे भाव कडाडले? तुमच्या शहरात काय आहेत सोन्याचे दर? जाणून घ्या

पगारासोबत मिळतील 'या' सुविधा 

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 20,000 रुपये ते 70,000 रुपये या वेतनश्रेणीखाली नियुक्त केले जाईल. सुरुवातीच्या स्तरावर त्यांचा एकूण पगार (एकूण वेतन) अंदाजे 42,320 रुपये दरमहा असेल. यामध्ये महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि शहर भत्ता यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, प्रोविडेंट फंड (PF), राष्ट्रीय पेन्शन योजना  (NPS), ग्रॅच्युइटी, लीव्ह एन्कॅशमेंट (Leave Encashment), कन्व्हेयन्स लोन अशा अनेक इतर सुविधा देखील दिल्या जातील.

 हे ही वाचा: बेस्ट कंडक्टरनं मुलाचा गळा दाबला, त्याला खाली आपटून मारलं; नंतर स्वत:ला संपवलं! प्रकरण काय?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 3 मे पासून सुरु करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवार 24 मे पर्यंत ऑनलाइन अर्ज भरू शकतात. अर्ज करण्यासाठी NHDC च्या अधिकृत वेबसाइट  www.nhdc.org.in वर जाऊन त्यावरील 'Career Page' मध्ये उपलब्ध असलेल्या लिंकच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करु शकतात. याबद्दल सविस्तर जाहिराती आणि इतर माहितीसाठी NHDC ची अधिकृत माहिती तपासत राहा. 

हे वाचलं का?

    follow whatsapp