मसूद अजहरच्या घरी मृतदेहांची रांग! ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानातील 'ते' भयानक फोटो आले समोर
Operation Sindoor Masood Azhar Family Viral Photo : भारतीय सेना दलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अजहरचा अड्डा उद्ध्वस्त केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ऑपरेशन सिंदूरने मसूद अजहरच्या संपूर्ण कुटुंबाला संपवलं

मसूद अजहरच्या घरी लागली मृतदेहांची रांग

पाकिस्तानमधील सर्वात भयानक फोटो झाले व्हायरल
Operation Sindoor Masood Azhar Family Viral Photo : भारतीय सेना दलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अजहरचा अड्डा उद्ध्वस्त केला. भारतीय सैनिकांनी पाकिस्तान सीमेवरून 100 किमीवर असलेल्या बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयासह अन्य ठिकाणांवर हल्ला केला. या हल्ल्यात मसूद अजहरच्या कुटुंबातील 10 जण ठार झाले. तसच अजहरचे जवळचे चार सहकारीही या हल्ल्यात मारले गेले. दरम्यान, मसूद अजहरच्या घरी मृतदेहाची रांग लागल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मसूद अजहर मोस्ट वॉन्टेड दशहतवाद्यांच्या लिस्टमध्ये अग्रस्थानी
जैश-ए-मोहम्मदने परिपत्रक जारी करून या हल्ल्याची पुष्टी केली आहे. एअरस्ट्राईक मध्ये मारले गेलेल्या अजहरच्या कुटुंबातील सदस्यांचा दफनविधी आजच केला जाणार आहे. मसूद अजहर भारत आणि जगातील मोस्ट वॉन्टेड दशहतवाद्यांच्या लिस्टमध्ये अग्रस्थानी आहे. दहशतवाद्यांनी ज्या मस्जिदला अड्डा बनवला होता, त्यालाही या एअर स्ट्राईकने उडवलं आहे. या हल्ल्याबाबत जैश-ए-मोहम्मद (जेईएम)चा प्रमुख मसूद अजहरची प्रतिक्रियाही समोर आली आहे.
हे ही वाचा >> बेस्ट कंडक्टरनं मुलाचा गळा दाबला, त्याला खाली आपटून मारलं; नंतर स्वत:ला संपवलं! प्रकरण काय?

भारताने केलेल्या मिसाईल हल्ल्यात त्यांचे 10 नातेवाईक मारले गेले आहेत. मी पण मेलो असतो तर बरं झालं असतं, असं अजहरने म्हटलंय. अजहरच्या कुटुंबातील मृतांमध्ये त्याची मोठी बहीण आणि तिचा पती, अजहरचा भाचा आणि त्याची पत्नी, तसच पुतण्यासह कुटुंबातील पाच मुलांचा समावेश आहे. बहावलपूरमध्ये मारले गेलेल्या लोकांच्या मृतदेहाजवळ पाकिस्तानच्या नागरिकांनी बुधवारी शोक व्यक्त केला. तसच रस्त्यावर अंत्ययात्राही काढली होती.

भारताच्या हल्ल्यावर पाकिस्तानच्या स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्ती केली आहे. पाकिस्तानी झेंड्यात गुंडाळलेल्या मृतदेहांचे फोटोही समोर आले आहेत. भारताने मंगळवारी रात्री पाकिस्तान आणि पीओकेत असलेल्या दहशतवादी अड्ड्यांवर एअर स्ट्राईक केला. पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या दहशवादी हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिलं. या दहशतवादी हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाला होता.