Air Defence System: भारताने लाहोरमध्ये घुसून जी Air डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त केली 'ती' नेमकी असते तरी काय?

मुंबई तक

What is Air Defence System: एअर डिफेन्स सिस्टम ही कोणत्याही देशाच्या संरक्षण यंत्रणेचा अविभाज्य भाग आहे. ती रडार, मिसाइल्स, तोफा, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि कमांड सेंटर्स यांच्या समन्वयाने काम करते.

ADVERTISEMENT

Air Defence System  नेमकी असते तरी काय? (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok)
Air Defence System नेमकी असते तरी काय? (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok)
social share
google news

नवी दिल्ली: पाकिस्तानने काल (7 मे) रात्रीच्या सुमारास भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले जे भारताने वेळीच निष्प्रभ केले. ज्यानंतर आज (8 मे) सकाळी भारतीय लष्कराने Drone Strike करत थेट लाहोरमधील पाकिस्तानची Air डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त केली. ज्यामुळे पाकला मोठा हादरा बसला आहे. कारण कोणताही हवाई हल्ला रोखण्यात ही सिस्टम अत्यंत महत्त्वाची असते. पण त्याच सिस्टिमला मुळापासून उखडून भारताने पाकिस्तानला हादरवून टाकलं आहे. पण ही  Air डिफेन्स सिस्टम काय असते आणि तिचं नेमकं काम काय असतं हे आपण सविस्तरपणे समजून घेऊया.

एअर डिफेन्स सिस्टम (हवाई संरक्षण यंत्रणा) ही एक अशी यंत्रणा आहे जी हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी वापरली जाते, जसे की विमाने, हेलिकॉप्टर्स, ड्रोन, मिसाइल्स किंवा इतर हवाई शस्त्रे. ही यंत्रणा सैन्य, महत्त्वाची स्थळे, शहरे किंवा रणनीतिक ठिकाणांचे रक्षण करण्यासाठी डिझाइन केलेली असते. यामध्ये अनेक तंत्रज्ञान आणि उपकरणांचा समावेश असतो जे शत्रूच्या हवाई हल्ल्यांना शोधून त्यांना नष्ट करण्यास किंवा त्यांचा प्रभाव कमी करण्यास सक्षम असतात.

एअर डिफेन्स सिस्टम (Air Defence System) नेमकी आहे तरी काय?

रडार सिस्टम (Radar System):

  • रडार हा हवाई संरक्षण यंत्रणेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. याच्या मदतीने शत्रूचे विमान, मिसाइल किंवा ड्रोन शोधले जाते.
  • रडार हवेतून येणाऱ्या वस्तूंची दिशा, वेग, उंची आणि अंतर मोजते. 
  • आधुनिक रडार सिस्टम्स स्टेल्थ तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या विमानांनाही शोधू शकतात.

मिसाइल सिस्टम (Missile Systems):

हे वाचलं का?

    follow whatsapp