पत्नीला इंस्टाग्रामवर रील बनवायचा नाद... पती संतापला अन् किरकोळ वादातून घडली भयानक घटना
इंस्टाग्राम रीलवरून झालेल्या वादात एका महिलेचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. रील बनवण्याच्या कारणामुळे घरात भांडण झालं आणि रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पत्नीला इंस्टाग्रामवर रील बनवायचा नाद...
किरकोळ वादातून घडली भयानक घटना
संतापलेल्या पतीने पत्नीसोबत काय केलं?
Crime News: छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे इंस्टाग्राम रीलवरून झालेल्या वादात एका महिलेचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, येथे एका महिलेला इंस्टाग्रामवर रील बनवण्याची आवड होती, मात्र तिच्या या आवडीमुळे तिचा पती पत्नीवर अतिशय संतापला. याच कारणामुळे घरात भांडण झालं आणि रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जिल्ह्यातील राजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अखोराखुर्द गावात घडली. याबाबत पोलिसांनी सांगितलं की, प्रकरणातील 28 वर्षीय आरोपी कुंदन राम याने त्याची 25 वर्षीय पत्नी किरण हिची चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. स्थानिक ग्रामस्थ हिरनराम पहाडी कोरवा यांनी संबंधित घटनेची तक्रार बरियों पोलिस ठाण्यात केली.
तक्रारदाराने काय सांगितलं?
तक्रारदाराने सांगितलं की, जवळपास 11:30 वाजताच्या सुमारास आरोपी कुंदन त्याच्या घरी आला आणि त्याने अतिशय घाबरत आपल्या पत्नीच्या छातीत चाकू लागल्याचं सांगितलं. जेव्हा ते कुंदनच्या घरी पोहोचले तेव्हा पीडित महिला खोलीच्या आत बेडवर मृतावस्थेत पडलेली होती. तिच्या छातीवर खोल जखम होती. तसेच, या जखमेमुळे प्रचंड रक्तस्त्राव पण झाला होता.
हे ही वाचा: मुंबईची खबर: 'या' मार्गावरील डबल डेकर ब्रिजचं काम सुरू.... प्रवाशांचा प्रवास आणखी सोपा होणार!
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यानंतर, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. यासोबतच, घटनेत वापरण्यात आलेला चाकू देखील जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित घटनेचा तपास केला आणि आरोपी कुंदन रामला अटक केली.










