Govt Job: भारत सरकारच्या 'या' कंपनीमध्ये इंजीनिअर तरुणांसाठी भरती! 13 लाखांचं पॅकेज अन्... पटापट करा अर्ज
भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (BEL) कडून प्रोबेशनरी इंजीनिअर पदाच्या एकूण 340 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भारत सरकारच्या 'या' कंपनीमध्ये इंजीनिअर तरुणांसाठी भरती!
नियुक्त उमेदवारांना मिळणार 13 लाखांचं पॅकेज...
कधीपर्यंत कराल अर्ज?
Govt Job: सरकारी नोकरीसाठी प्रयत्नात असणाऱ्या उमेदवारांना नव्या भरतीची संधी उपलब्ध झाली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (BEL) कडून प्रोबेशनरी इंजीनिअर पदाच्या एकूण 340 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची ऑनलाइन प्रक्रिया काल 24 ऑक्टोबर पासून सुरू झाली असून उमेदवार bel-india.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना जवळपास 13 लाख रुपयांचं (सीटीसी) पॅकेज देण्यात येईल. यामधील रिक्त जागांसाठी 139 पदे अनारक्षित असून 34 पदे ईडब्ल्यूएस, 91 पदे ओबीसी, 51 पदे एससी आणि 25 पदे एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी आरक्षित आहेत.
'या' पदांसाठी निघाली भरती
प्रोबेशनरी इंजीनिअर (इलेक्ट्रॉनिक्स) E ग्रेड 2- 175 पदे
प्रोबेशनरी इंजीनिअर (मॅकेनिकल) E ग्रेड 2- 190 पदे
प्रोबेशनरी इंजीनिअर (कंप्यूटर सायन्स) E ग्रेड 2- 42 पदे
प्रोबेशनरी इंजीनिअर (इलेक्ट्रिकल) E ग्रेड 2- 14 पदे
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अनारक्षित, ओबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांकडे इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्यूनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलीकम्यूनिकेशन/ कम्यूनिकेशन/ टेलीकम्यूनिकेशन/ मॅकेनिकल/ कंप्यूटर सायन्स/ कंप्यूटर सायन्स अॅण्ड इंजीनिअरिंग/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स अशा संबंधित विषयांमध्ये B.E किंवा B.Tech तसेच, बीएससी अथवा इंजीनिअरिंग ग्रॅज्युएट मध्ये फर्स्ट क्लासची डिग्री असणं अनिवार्य आहे.










