मोठी बातमी : फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी उचललं, PSI अजूनही फरार

मुंबई तक

Satara doctor suicide case : तपासादरम्यान प्रशांत बनकर याने मृत डॉक्टरांशी सतत संपर्क साधला असल्याचे कॉल रेकॉर्ड्समधून उघड झाले होते

ADVERTISEMENT

Satara doctor suicide case
Satara doctor suicide case
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांकडून अटक

point

दुसरा आरोपी पीएसआय बदने अजूनही फरार

Satara doctor suicide case : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी तपासाला वेग आलाय.  फरार असलेला आरोपी प्रशांत बनकर याला सातारा पोलिसांनी अखेर अटक केली आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी पीएसआय बदने अजूनही फरार असून, त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. फलटणमधील ही आत्महत्येची घटना काल समोर आली होती. मृत डॉक्टर महिलेने  फलटण शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणाने संपूर्ण सातारा जिल्हा हादरला होता. तपासादरम्यान मृत डॉक्टरांनी आत्महत्येपूर्वी हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आरोपी प्रशांत बनकर याने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा थेट उल्लेख केल्याचं समोर आलं होतं.

प्रशांत बनकर याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

घटनेनंतर फलटण शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोन आरोपींविरोधात शोधमोहीम सुरू केली होती. सातारा एलसीबी (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा) आणि फलटण पोलिसांच्या दोन पथकांना तपासासाठी रवाना करण्यात आलं होतं. त्यानंतर आज अखेर प्रशांत बनकर याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या आहेत. या अटकेनंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.

हेही वाचा : दोन तरूण पती-पत्नी म्हणून राहायचे, खोलीतून आला मुलीचा आवाज.. तरुणाने गे पार्टनरचा प्रायव्हेट पार्टच टाकला कापून!

दरम्यान, आत्महत्येच्या दिवशी मृत डॉक्टरांनी हॉटेलमध्ये सायंकाळी सातच्या सुमारास रूम घेतली होती. त्या एकट्याच आत गेल्या होत्या. रात्री आठ वाजल्याच्या सुमारास त्यांच्या बहिणीचा सतत फोन लागत होता, मात्र प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडल्यावर डॉक्टर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या. पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाईड नोट, मोबाईल आणि इतर पुरावे जप्त केले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp