दोन तरूण पती-पत्नी म्हणून राहायचे, खोलीतून आला मुलीचा आवाज.. तरुणाने गे पार्टनरचा प्रायव्हेट पार्टच टाकला कापून!
रामबाबू यादव नावाचा एक समलिंगी पुरुष वर्षानुवर्षे त्याच्या पुरुष मित्रासोबत पती-पत्नी म्हणून राहत होता. गेल्या मंगळवारी रामबाबूने त्याच्या मित्राच्या 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. हे पाहून पार्टनरने रामबाबूच्या गुप्तांगावरच चाकूने हल्ला केला.
ADVERTISEMENT

देवरिया (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे राहणारा रामबाबू यादव नावाचा एक समलिंगी पुरुष वर्षानुवर्षे त्याच्या मित्रासोबत पती-पत्नी म्हणून राहत होता. गेल्या मंगळवारी रामबाबूने त्याच्या समलिंगी मित्राच्याच 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पहाटे 1.30 वाजताच्या सुमारास, पीडितेच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकला आणि खोलीत धाव घेतली. आपला जोडीदारच हे घृणास्पद कृत्य करत असल्याचे पाहून त्याचे रक्त खवळले. त्याने थेट आरोपी रामबाबू यादवच्या गुप्तांगावर चाकूने हल्ला केला, ज्यामुळे तो जखमी झाला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर रामबाबू यादव याला रुग्णालयात दाखल केले आहे.
दोघे तरूण राहायचे पती-पत्नी बनून
देवरियाच्या खुखुंडू पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. महाराजगंज येथील रहिवासी रामबाबू यादव एका मित्रासोबत पती-पत्नी म्हणून राहत होता. रामबाबूचा मित्र एक विवाहित ऑर्केस्ट्रा डान्सर होता आणि त्याला एक मुलगी होती. तरीही, दोघेही अनेक वर्षांपासून समलैंगिक संबंधात होते. रामबाबू "पती" म्हणून आणि त्याचा मित्र "पत्नी" म्हणून भाड्याच्या घरात राहत होते. यामुळे रामबाबूच्या मित्राची पत्नी त्याला सोडून वेगळी राहत होती.
हे ही वाचा>> दोघेही OYO मध्ये असायचे, तरुणी 'त्याला' सतत बोलवायची, पण 'त्या' रात्री...
दरम्यान, रामबाबूच्या मित्राची 6 वर्षांची मुलगी काही काळासाठी तिच्या वडिलांकडे राहण्यासाठी आली होती. मंगळवारी रात्री 1.30 च्या सुमारास रामबाबू यादवने त्याच्या मित्राच्या मुलीवर बलात्कार केला. मुलीच्या ओरडण्याने वडील जागे झाले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या वडिलांनी रामबाबू यादवच्या गुप्तांगावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर त्याने स्वत:च या घटनेची माहिती पोलिसांना दिली. खुखुंडू पोलिसांनी घटनास्थळी येऊन जखमी आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याला वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले.
हे ही वाचा>> 'त्या' मोठ्या पक्षाच्या WhatsApp ग्रुपमध्ये आल्या अश्लील Video, घाणेरड्या ऑडिओ अन्...
पोलिसांची कारवाई सुरू
अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुनील कुमार सिंह म्हणाले की, तक्रारदाराच्या माहितीची तात्काळ दखल घेण्यात आली आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे आणि पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून योग्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्यांनी असेही सांगितले की, आरोपीने समलैंगिक संबंध असल्याचे कबूल केले आहे. पोलीस आवश्यक कायदेशीर कारवाई करत आहेत.










