झोका खेळत असताना गळ्याला फास बसला, धुळ्यातील 9 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई तक

Dhule News : झोका खेळत असताना गळ्याला फास बसला, धुळ्यातील 9 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

ADVERTISEMENT

Dhule News
Dhule News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

झोका खेळत असताना गळ्याला फास बसला

point

धुळ्यातील 9 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

शिरपूर  : शिरपूर शहरातील गवळी वाडा परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने परिसरातील नागरिकांना हळहळ व्यक्त करायला लावली आहे. झोक्यावर खेळताना गळफास लागल्याने गंभीर जखमी झालेल्या नऊ वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कृष्णा प्रभाकर पाटील (वय 9) असे मृत बालकाचे नाव असून, या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

नऊ वर्षीय मुलाच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 21 ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास कृष्णा आपल्या राहत्या घरात झोक्यावर खेळत होता. खेळताना अचानक त्याचा तोल गेला आणि झोक्याच्या दोरीत त्याचा गळा अडकला. काही क्षणातच तो शुद्ध हरपून खाली कोसळला. घरातील सदस्यांनी आरडाओरड ऐकून धाव घेतली आणि कृष्णाला गळ्यातून दोरी सोडवून तातडीने जवळच्या नगरपालिका रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा : जालना: सात ते आठ जणांकडून तरुणावर लोखंडी रॉडसह लाठी काठीने हल्ला, 'त्या' कारणावरून तरुणाला रात्रीच संपवलं

पालिकेतील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी धुळ्यातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना बुधवारी (दि. 22) सकाळी कृष्णाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही शोककळा पसरली आहे. अचानक घडलेल्या या घटनेने पालकांना तसेच नातेवाईकांना धक्का बसला आहे. खेळताना लहान मुलांवर लक्ष ठेवणे किती आवश्यक आहे, याची जाणीव या प्रसंगाने सर्वांना झाली आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp