अमरावती हादरली, कृषी विभागातील लिपिकाची प्रेम प्रकरणातून हत्या, विवाहित महिलेसोबत होते अनैतिक संबंध
Amravati crime : अमरावती हादरली, कृषी विभागातील लिपिकाची प्रेम प्रकरणातून हत्या, विवाहित महिलेसोबत होते अनैतिक संबंध
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अमरावती हादरली, कृषी विभागातील लिपिकाची प्रेम प्रकरणातून हत्या
विवाहित महिलेसोबत होते अनैतिक संबंध
Amravati crime : जिल्ह्यातील मोर्शी शहरात घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. उपविभागीय कृषी कार्यालयात कार्यरत असलेल्या लिपिकाची प्रेमप्रकरणातून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला आल्याने संतापाच्या भरात त्याने लोखंडी सळईने मारहाण करून लिपिकाचा खून केला. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली असून, या घटनेने सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
येरला विभागाच्या परिसरात आढळला होता मृतदेह
मृत लिपिकाचे नाव विनोद राऊत (वय 52) असे असून ते मोर्शी येथील उपविभागीय कृषी कार्यालयात कार्यरत होते. गुरुवारी रात्री तालुका फळरोप वाटिका, येरला विभागाच्या परिसरात त्यांचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळला. रात्री उशिरा एका कर्मचाऱ्याला मृतदेह दिसल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आणि प्राथमिक तपासात प्रेमसंबंधातून खून झाल्याचे स्पष्ट झाले.
तपासादरम्यान पोलिसांना समजले की, आरोपी धनराज वानखडे याच्या पत्नीसोबत लिपीक राऊत यांचे अनैतिक संबंध होते. याच कारणावरून दोघांमध्ये अनेकदा वाद झाले होते. अखेर गुरुवारी रात्री रागाच्या भरात धनराज वानखडेने राऊत यांच्यावर लोखंडी सळईने हल्ला चढवला. डोक्यावर आणि शरीरावर जबर मारहाण केल्याने राऊत गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला, मात्र पोलिसांनी काही तासांतच त्याला अटक केली.










