SSC 10th Result 2025 : विद्यार्थ्यांनो! दहावीचा निकाल लवकरच..या लिंकवर डाऊनलोड करा मार्कशीट

मुंबई तक

SSC Result 2025 Latest Update : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात पार पडली.

ADVERTISEMENT

Maharashtra SSC Result 2025
Maharashtra SSC Result 2025
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दहावीचा निकाल कसा कराल डाऊनलोड?

point

या लिंकवर डाऊनलोड करा मार्कशीट

point

दहावीच्या निकालाबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

SSC Result 2025 Latest Update : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात पार पडली. 5 मे 2025 रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. आता दहावीच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे. हा निकाल अधिकृत वेबसाईट mahahsscboard.in वर लवकरच घोषित केला जाईल. विद्यार्थी इथे दिलेल्या डायरेक्ट लिंकने एसएससी रिझल्ट 2025 डाऊनलोड करू शकतात. 

महाराष्ट्र बोर्ड एसएससीच्या रिझल्टची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड हायर सेकेन्डरी एज्युकेशन (MSBSHSE) कडून एसएससी म्हणजे इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, तो बोर्डाची अधिकृत वेबसाईट mahahsscboard.in वर रोल नंबर टाकून आपला निकाल पाहू शकतात. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावीच्या परीक्षेचं आयोजन 21 फेब्रुवारीपासून 17 मार्च 2025 पर्यंत करण्यात आलं होतं. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व विषयात कमीत कमी 35 टक्के गुणांची आवश्यकता असते.

हे ही वाचा >> एकीकडे एअर स्ट्राईक, नंतर ड्रोन हल्ला, आता धरणाचे दरवाजे उघडले... पाकिस्तानला तिसरा धक्का?

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कसा कराल डाऊनलोड?

  • महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • त्यानंतर एसएससी 10 वीच्या रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
  • आता तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल.
  • इथे आवश्यक माहिती टाकून सबमीट करा.
  • आता विद्यार्थी त्यांचा निकाल डाऊनलोड करू शकतात.

गतवर्षी महाराष्ट्र बोर्डाचा एसएससीचा निकाल 27 मे रोजी जाहीर करण्यात आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यंदाचा निकालही 15 मे पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. परंतु, बोर्डाने अजूनही निकालाच्या तारखेची अधिकृतपणे घोषणा केली नाहीय.

हे ही वाचा >>  Air Defence System: भारताने लाहोरमध्ये घुसून जी Air डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त केली 'ती' नेमकी असते तरी काय?

हे वाचलं का?

    follow whatsapp