Ind vs Pak: भारताचा लाहोरवर सर्वात मोठा हल्ला सुरू, पाकच्या दिशेने भारताचे फायटर झेपावले!

मुंबई तक

Pakistan Attack On Jammu Airstrip :  पाकिस्तानने आज गुरुवारी रात्री जम्मू येथील एअरस्ट्रीपवर रॉकेट हल्ला केला. परंतु, भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देत S-400 च्या माध्यमातून पाकिस्तानचे 8 मिसाईल्स निकामी केले.

ADVERTISEMENT

ऑपरेशन सिंदूर
ऑपरेशन सिंदूर
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पाकिस्तानने भारतावर केले ड्रोन हल्ले

point

भारतानेही पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल केले उद्ध्वस्त

point

पाकच्या दिशेने भारताचे फायटर झेपावले!

Pakistan Attack On Jammu Airstrip :  पाकिस्तानने आज गुरुवारी रात्री जम्मू येथील एअरस्ट्रीपवर रॉकेट हल्ला केला. परंतु, भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देत S-400 च्या माध्यमातून पाकिस्तानचे 8 मिसाईल्स निकामी केले. तसच पाकिस्तानचे दोन JF-17 आणि एक F-16 जेटही पाडलं. पाकिस्तानने सांबामध्ये मोठा गोळीबार केला. पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यामुळे जम्मूतील आरएसपुरा परिसरात ब्लॅकआऊट केलं आहे.

या परिसरात सतत सायरन वाजवले जात आहेत. जम्मूमध्ये मोबाईल नेटवर्कही जॅम झालं आहे. सतवरी कॅम्प, कुपवाडामध्येही मोठा गोळीबार झाला आहे. पुंछ आणि राजौरीतही जोरदार हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताचे फायटर जेट पाकिस्तानकेड झेपावले आहेत. भारताने पाकिस्तानच्या लाहौरवर जोरदार हल्ला केला आहे. 

हे ही वाचा >> पाकिस्तानकडून पुन्हा हल्ला, कुठे Attack.. कुठे ब्लॅक आऊट? सगळ्यात अचूक माहिती फक्त मुंबई Tak वर

भारतीय एअर डिफेन्सकडून अनेक ठिकाणी हवाई हल्ले करणारी मिसाईल सिस्टम तैनात करण्यात आली आहे. भारताकडूनही पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरु आहे. जम्मू विमानतळाजवळ, पठाणकोट, अखनूर सेक्टर आणि सांबा परिसरात ब्लॅकआऊट करण्यात आलं आहे. भारताच्या फायटर जेट्सने जम्मू एअरपोर्ट्सवरून उड्डाण घेतलं आहे. 

भारताने पाकिस्तानचे 8 मिसाईल्सही पाडल्याची माहिती आहे. पाकिस्तानने उधमपूर, जम्मू, अखनूर आणि पठाणकोट येथे ड्रोन हल्ला केला. एका ड्रोन जम्मू विमानतळावर हिट झालाय. तर भारताच्या एअर डिफेन्सने पाकिस्तानचे तीन ड्रोन पाडले आहेत. दरम्यान, भारताचे फायटर विमान पाकिस्तानच्या दिशेनं रवाना झाले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp