ऑपरेशन सिंदूरचे 5 Hero: एकाने तयार केली रणनीति, तर दुसऱ्याने काढली गुप्त माहिती, हे आहेत एअर स्ट्राइकचे सुपर कमांडर!

मुंबई तक

ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणारे खरे नायक नेमके कोण याबाबत नेमकी माहिती आम्ही आपल्याला देणार आहोत. जाणून घ्या ते 5 हिरो आहेत तरी कोण.

ADVERTISEMENT

ऑपरेशन सिंदूर चे 5 Hero
ऑपरेशन सिंदूर चे 5 Hero
social share
google news

नवी दिल्ली: भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor)घडवत पाकिस्तानाला मोठा दणका दिला. भारतीय हद्दीतूनच पाकिस्तानमध्ये खोलवर हल्ले चढवत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पण ही गोष्ट करणं तेवढी काही सोप्पी नव्हती. त्यामुळे हे नेमकं कसं घडलं आणि त्याचे नेमके हिरो कोण हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत. 

ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) खरे तर 5 हिरो आहेत. त्यापैकी कोणी रणनिती आखली तर कोणी गुप्त माहिती काढली. त्यामुळे हे 5 हिरो नेमके कोण हे आपण आता जाणून घेऊया.

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी: ऑपरेशन सिंदूरचे सर्वोच्च कमांडर (PM Narendra Modi)

राष्ट्रपती हे तिन्ही सैन्यदलांचे सर्वोच्च कमांडर असले तरी 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च कमांडरची भूमिका बजावली आहे. 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण ऑपरेशनची सूत्रं स्वतःच्या हाती घेतली. 

हे ही वाचा>> Air Defence System: भारताने लाहोरमध्ये घुसून जी Air डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त केली 'ती' नेमकी असते तरी काय?

या हल्ल्यात दहशतवाद्यांनी महिलांच्या आणि मुलांच्या समोर त्यांच्या घरातील कर्त्या लोकांचा जीव घेतला. "जा आणि मोदींना सांगा." असं म्हणत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये मृत्यूचं तांडवं केलं होतं. दहशतवाद्यांचे हेच शब्द पंतप्रधान मोदींच्या मनाला डागण्या देत होते. त्यामुळेच त्यांनी ठरवलं की, या हल्ल्याचा बदला घेतलाच पाहिजे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की दहशतवाद्यांची उरलेली जमीनही उद्ध्वस्त केली जाईल आणि दहशतवाद्यांसह त्यांच्या मालकांचा कणा मोडला जाईल.

हे वाचलं का?

    follow whatsapp