साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात देवेेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर, आरोपींवर मोठी कारवाई

मुंबई तक

Devendra Fadnavis on female doctor suicide case : साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात देवेेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर, आरोपींवर मोठी कारवाई

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट

point

देवेेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर आरोपींवर मोठी कारवाई

Devendra Fadnavis on female doctor suicide case : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे झालेले पाहायला मिळत आहेत. दोन पोलीस अधिकाऱ्यांनी तिचा मानसिक छळ केल्याचा आरोप तिने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये केला आहे. शिवाय, PSI गोपाल बदने याने 5 महिने सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचंही तिने याच नोटमध्ये नमूद केलंय. दरम्यान, या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कारवाई करत दोघांना निलंबित केलं आहे. शिवाय या प्रकरणातील आरोपी असलेल्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

दोन पोलीस अधिकाऱ्यांकडून आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचा छळ 

नोटमध्ये डॉक्टरने लिहिले आहे की, PSI गोपाल बदनेनी तिचं पाच महिन्यांपासून वारंवार लैंगिक शोषण केले, तसेच पोलीस अधिकारी प्रशांत बनकर यांनी तिला मानसिक छळ केला.दोघांच्या त्रासाला कंटाळून तिने हॉटेलमध्ये जाऊन सुसाईड केली. आता पोस्टमॉर्टेम होईल, त्यात आणखी गोष्टी समोर येतीलच, मात्र तिनं हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटची फॉरेन्सिक तपासणी सुरू केली आहे. आता ही घटना समोर आल्यानंतर यासंदर्भातील अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टर या गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. एका वैद्यकीय तपासणीच्या प्रकरणात पोलिसांशी त्यांचा वाद झाला होता, त्यानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती.

हेही वाचा : पुणे हादरलं, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीला पत्नीने गळा आवळून संपवलं, मुलं घरात असतानाच घडला प्रकार

चौकशीदरम्यान त्यांनी आपल्या वरिष्ठांना आणि सोबतच डीवायएसपींना लेखी स्वरूपात तक्रार देत म्हटले होते की, “माझ्यावर अन्याय होत आहे. मी आत्महत्या करेन.”  त्यांच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याचं सांगण्यात येत आहे.  आता या प्रकरणाची नोंद फलटण पोलीस ठाण्यात झाली असून, त्यांच्या आत्महत्येमागे नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू आहे. पोलिस मात्र यावर काही बोलायला तयार नाहीत.  आत्महत्येपूर्वी या तिच्यावर फलटण पोलिसांकडून सातत्याने दबाव आणला जात होता, असा आरोप नातेवाईकांनी केलाय. तिच्या तक्रारीनंतरही पोलीस यंत्रणेने कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असा गंभीर आरोप नातेवाईक करत आहेत. आता चौकशीचे आदेश दिले जातील, राजकारण होईल, मात्र गेलेला जीव परत येणार नाही. या  घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp