फ्रेशर्स पार्टीमध्ये तरुणाला बेदम मारहाण अन् निर्घृण हत्या.. लातूरच्या खाजगी कॉलेजमध्ये नेमकं काय घडलं?
एका खाजगी कॉलेजमध्ये झालेल्या फ्रेशर्स पार्टीमध्ये विद्यार्थ्यावर हल्ला करून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात सहा तरुणांना अटक केल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
फ्रेशर्स पार्टीमध्ये तरुणाला बेदम मारहाण
कॉलेजमधील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या
लातूरच्या खाजगी कॉलेजमध्ये नेमकं काय घडलं?
Crime News: लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका खाजगी कॉलेजमध्ये झालेल्या फ्रेशर्स पार्टीमध्ये विद्यार्थ्यावर हल्ला करून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात सहा तरुणांना अटक केल्याची माहिती आहे. संबंधित घटना 8 ऑक्टोबर रोजी लातूरच्या MIDC परिसरात असलेल्या एका कॉलेजमधील फ्रेशर्स पार्टीच्या दरम्यान घडली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
मारहाणीत पीडित तरुणाचा मृत्यू
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डान्स करतेवेळी किरकोळ कारणावरून झालेल्या या वादाचं मारहाणीत रुपांतर झालं. त्यावेळी, घटनेतील पीडित तरुण सुरज शिंदे यांचं इतर काही विद्यार्थ्यांसोबत मोठं भांडण झालं. रागाच्या भरात विद्यार्थ्यांच्या त्या ग्रुपने पीडित तरुणाला दांडके आणि बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हाणामारीत सुरजच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आणि त्यानंतर त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, पीडित तरुणाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
हे ही वाचा: "पत्नीचे तीन बॉयफ्रेंड्स..." जावयाने सासऱ्याकडे केली तक्रार पण, उलट उत्तर मिळालं अन् रागाच्या भरात चुकीचं पाऊल...
सहा आरोपी सध्या पोलिसांच्या अटकेत...
घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून 16 ऑक्टोबर पर्यंत संबंधित घटनेतील चार आरोपींना अटक केली गेली. त्यानंतर, मंगळवारी (21 ऑक्टोबर) प्रकरणातील आणखी दोन तरुणांना अटक करण्यात आली. अशातच, या घटनेतील सहा आरोपी सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत.
हे ही वाचा: माझ्यावर बलात्कार झालाय, आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या हातावर मजकूर आढळला; सातारा हादरला!
आरोपीविरोधात गुन्हा दाखल
यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील सहा आरोपींना भारतीय दंड संहितेच्या (BNS)च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये हत्या, जाणूनबुजून दुखापत करणं, धारदार शस्त्रे किंवा साधनांचा वापर करून गंभीर दुखापत करणं, गुन्हेगारी धमकी देणं आणि शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणं यांचा समावेश असल्याची माहिती आहे. पोलिसांचं पथक या प्रकरणातील पुढील तपास करत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.










