"पत्नीचे तीन बॉयफ्रेंड्स..." जावयाने सासऱ्याकडे केली तक्रार पण, उलट उत्तर मिळालं अन् रागाच्या भरात चुकीचं पाऊल...
एका तरुणाने तिच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध सुरू असल्याची तक्रार आपल्या सासऱ्याकडे केली होती. मात्र, तक्रार ऐकून सुद्धा सासऱ्याने आपल्या मुलीची साथ दिली आणि यामुळे संतापलेल्या पतीने टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पत्नीचे लग्नानंतर विवाहबाह्य संबंध...
जावयाने सासऱ्याकडे केली तक्रार पण, उलट उत्तर मिळालं अन्...
रागाच्या भरात उचललं चुकीचं पाऊल...
Crime News: विवाहबाह्य संबंधामुळे पती आणि पत्नीच्या संसारात होत्याचं नव्हतं होऊन बसतं. लग्नानंतर सुद्धा पत्नीच्या अनैतिक प्रेमसंबंधामुळे अशीच एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. खरंतर, एका तरुणाने तिच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध सुरू असल्याची तक्रार आपल्या सासऱ्याकडे केली होती. मात्र, तक्रार ऐकून सुद्धा सासऱ्याने आपल्या मुलीची साथ दिली आणि यामुळे संतापलेल्या पतीने टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.
6 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली
संबंधित घटना ही उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडल्याची माहिती आहे. येथे एका तरुणाने सुपारी देऊन आपल्याच सासऱ्याची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. हे प्रकरण मुरारीलाल चेस्ट हॉस्पिटलमधील आहे. या रुग्णालयात अनीता देवी नावाची महिला उपचारांसाठी दाखल होती. त्यावेळी, तिचा पती राजकुमार तिची काळजी घेण्यासाठी तिथे थांबला होता. काही दिवसांपूर्वीच, राजकुमारची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा शोध घेतल्यानंतर राजकुमारचा जावई मोहित तोमर यानेच त्याची हत्या केल्याची माहिती समोर आली. खरंतर, सासऱ्याच्या हत्येसाठी ऋषभ नावाच्या एका तरुणाला 6 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. आता या हत्येमागचं नेमकं कारण समोर आलं आहे.
हे ही वाचा: पुणे हादरलं, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीला पत्नीने गळा आवळून संपवलं, मुलं घरात असतानाच घडला प्रकार
आरोपीने पोलिसांना काय सांगितलं?
या प्रकरणाबाबत मोहितने पोलिसांना सांगितलं की, "लग्नापूर्वी माझ्या पत्नीचे तीन तरुणांसोबत अनैतिक संबंध होते. याच गोष्टीमुळे आमच्या दोघांमध्ये सतत वाद होत होते. मी माझ्या संसारात अजिबात खुश नव्हतो. खरंतर, पत्नीच्या प्रेमसंबंधाबाबत मी माझ्या सासऱ्यांकडे सुद्धा पत्नीची तक्रार केली, पण माझे सासऱ्यांनी उलट त्यांच्या मुलीची साथ दिली. इतकेच नव्हे तर, मला तुरुंगात पाठवण्याची सुद्धा धमकी दिली. यामुळे मला प्रचंड राग आला आणि मी माझ्या सासऱ्यांच्या हत्येची सुपारी दिली. खरंतर, मला माझ्या पत्नीची सुद्धा कारने चिरडून हत्या करायची होती आणि मेहुण्याला देखील मारून टाकायचं होतं. पण, त्याआधीच मी पकडलो गेलो."
हे ही वाचा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या, काही दिवसांपूर्वीच केलेली वरिष्ठांकडे तक्रार; नेमकं काय घडलं?
आरोपीला अटक
सध्या, आरोपीला अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मोहितने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला असून त्याच्याविरुद्ध पुढील कारवाई केली जात आहे. मोहितचं 11 वर्षांपूर्वी लग्न झालं असून सुद्धा त्याची पत्नी तिच्या प्रियकरांसोबत बोलत असल्याचं त्याने सांगितलं. याच गोष्टीमुळे घरात सतत वाद व्हायचे.









