राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव रात्रीतून बदलले, आता कोणाच्या नावाचा फलक लावला? सांगलीत काय घडलं?
Sangli Politics : राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव रात्रीतून बदलले, आता कोणाच्या नावाचा फलक लावला? सांगलीत काय घडलं?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव रात्रीतून बदलले
आता कोणाच्या नावाचा फलक लावला? सांगलीत काय घडलं?
Sangli Politics : जत तालुक्यातील प्रसिद्ध राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव काही अज्ञात सभासदांनी मध्यरात्री बदलल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कारखान्याच्या प्रवेशद्वारावरील कमानीवर ‘राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ असा नवीन फलक लावण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात राजकीय चर्चा रंगल्या आहेत. हा प्रकार कोणी आणि कोणत्या हेतूने केला, याबाबत प्रशासन आणि स्थानिक नागरिकांमध्ये तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
राजे विजयसिंह डफळे कोण होते?
राजे विजयसिंह डफळे हे जत संस्थानचे शेवटचे राजे होते. इ.स. 1928 ते 1948 या काळात त्यांनी जत संस्थानाचा कारभार पाहिला. त्यांच्या नावाने अनेक संस्था आणि शिक्षणसंस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. या संस्थांपैकी एक म्हणजे साखर कारखाना होय, जो जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मेहनतीतून उभा राहिला होता.
कारखान्याच्या नाव बदलावरून चर्चांना उधाण
मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी फलक बदलल्यानंतर सकाळी काही नागरिकांनी हा प्रकार पाहताच संताप व्यक्त केला. या कारवाईमागे राजकीय हेतू असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू करण्यात आला असून, जबाबदार कोण आहेत हे लवकरच स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा : मनोज जरांगे पाटलांनी घेतली पंकजा मुंडेंची बाजू, नेमकं काय म्हणाले?










