IAS अधिकाऱ्याच्या वडिलांचे महिलेसोबत बंद खोलीत अश्लील चाळे, रंगेहाथच सापडला अन्...
crime news : एका अधिकाऱ्याचे वडील एका महिलेसोबत एका बंद खोलीत रंगेहाथ पकडले गेले आहेत. या प्रकरणाची माहिती आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना समजताच त्यानी हा प्रकार बघून व्हिडिओ रेकॉर्ड केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महिलेसोबत पुरुष एकाच खोलीत
स्थानिकांनी व्हिडिओ केला रेकॉर्ड
Crime News : एका अधिकाऱ्याचे वडील एका महिलेसोबत एका बंद खोलीत रंगेहाथ पकडले गेले आहेत. या प्रकरणाची माहिती आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना समजताच त्यानी हा प्रकार बघून व्हिडिओ रेकॉर्ड केला. नंतर खोलीचा दरवाजा उघडून डोळ्यासमोर सुरु असलेलं चित्र पाहिलं असता, ते थक्क झाले. घटनास्थळी असलेल्यांच्या मते संबंधित व्यक्ती हा वरिष्ठ अधिकाऱ्याचा वडील आहे. असं बोललं जातंय की, तो यापूर्वीही या भागात आला होता आणि त्याच्यावर अनेकांनी संशय व्यक्त केला होता.
हे ही वाचा : जालना: सात ते आठ जणांकडून तरुणावर लोखंडी रॉडसह लाठी काठीने हल्ला, 'त्या' कारणावरून तरुणाला रात्रीच संपवलं
महिलेसह पुरुष बंद खोलीत, नागरिकांनी व्हिडिओ केले रेकॉर्ड
जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा स्थानिकांनी दरवाजा उघडून दोघांनाही आक्षेपार्ह परिस्थितीत पाहिलं. त्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. तेव्हा घटनास्थळी मोठी तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा आरोपीने हात जोडून वारंवार माफी मागण्याचा प्रयत्न केला. लोकांनी घटनास्थळी धाव घेत व्हिडिओ रेकॉर्ड़ केला, त्यात महिला माफी मागताना दिसत असून भयभीत झालेली दिसून येत आहे. या घटनेमुळे एकच चर्चा सुरु झाली आहे.
व्हिडिओत नेमकं काय?
संबंधित व्हिडिओ नागरिकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओत आरोपी माफी मागताना दिसत आहे. हा व्यक्ती आयएएस अधिकाऱ्याचा वडील असल्याचे सांगण्यात येत आहे. तो अनेकदा याच भागांत यायचा असे सांगण्यात येत होते.
हे ही वाचा : पनवेल: भलत्याच मृतदेहवर अंत्यसंस्कार, कोणाच्या हातून घडली एवढी मोठी चूक?
या प्रकरणात पोलीस किंवा स्थानिक प्रशासनाकडून अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही. संबंधित प्रकरणात स्थानिकांनी कारवाईची मागणी केली आहे. तर सोशल मीडियावर लोक अधिकाऱ्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या नैतिक जबाबदारीवर प्रश्न उपस्थित करत आहेत.










