अक्षय कुमार पाठोपाठ अभिनेता गोविंदाही कोरोना पॉझिटीव्ह

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशात कोरोनाचे रूग्ण वाढतायत. बॉलिवूडवरही कोरोनाचं सावट असल्याचं दिसून येतंय. आज अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. तर आता अक्षय पाठोपाठ अभिनेता गोविंदा यालाही कोरोनाची लागण झाली आहे.

ADVERTISEMENT

गोविंदा यांची कोरोना चाचणी केली होती. गोविंदा यांच्या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. गोविंदा यांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्यंत सावधगिरी बाळगून देखील गोविंदा आहुजा यांची कोविड 19ची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गोविंदा यांना सौम्य लक्षणं दिसत असून ते होम क्वारंटाइन आहेत. पत्नी सुनिता आहुजा यांनी गोविंदा यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी त्यांची चाचणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे.

सकाळी अभिनेता अक्षय कुमारने देखील त्याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं होतं. “मी सर्वांना सांगू इच्छितो की माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन असून डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती काळजी घेत असून प्रोटोकॉलही फॉलो करतोय. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी त्यांची चाचणी करून घ्यावी.” असं ट्विट अक्षयने केलं होतं.

हे वाचलं का?

अक्षय कुमारच्या रामसेतू या सिनेमाचं शूटींग गेल्या काही दिवसांपासून सुरु होतं. अक्षयला आता कोरोनाची लागण झाल्यामुळे या सिनेमाचं शूटिंग काही दिवसांसाठी थांबण्याची शक्यता आहे. रामसेतू सिनेमात अक्षयसोबत नुसरत भरुचा आणि जॅकलिन फर्नांडीस या अभिनेत्री काम करत आहेत. अक्षय कुमारचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्यानंतर आता या अभिनेत्रींनाही स्वतःची कोरोना चाचणी करुन घ्यावी लागणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT