Nana Patekar : “भाजप 350 ते 375 जागा…”, नाना पाटेकरांचं मोठं भाकित

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Nana Patekar big statement about the Lok Sabha elections 2024.
Nana Patekar big statement about the Lok Sabha elections 2024.
social share
google news

Nana Patekar on Narendra modi and lok sabha election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. विरोधी आणि सत्ताधारी राज्यानिहाय ताकद वाढवण्यासाठी रणनीतीवर काम करत आहेत. एक ओपिनियन पोलही समोर आला असून, त्याची चर्चा होत असताना अभिनेते नाना पाटेकरांनी मोठं विधान केलं आहे. पुन्हा मोदी सरकार येणार, असा दावा करताना जागांबद्दलही भाष्य केलं आहे. (Actor Nana Patekar Prediction about Lok Sabha election 2024 Result)

ADVERTISEMENT

अभिनेते नाना पाटेकर झी वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होत आहे, या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता? असा प्रश्न नाना पाटेकरांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना नाना पाटेकरांनी नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील, असं भाकित केलं.

लोकसभा निवडणूक 2024, नरेंद्र मोदी…

“बघा, खूपच चांगल्या पद्धतीने भाजप येईल. भाजप विरोधात तुमच्याकडे चांगला पर्याय नाही. इतकं चांगलं काम होत आहे की, 350 ते 375 जागांपर्यंत जातील. मला आश्चर्य वाटणार नाही. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील”, असं राजकीय भाकित नाना पाटेकरांनी केलं आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा >> अजित पवारांचं चॅलेंज, कोल्हेंना शरद पवारांचा ‘मेसेज’, काय झाली चर्चा?

लोकसभेचा रणसंग्राम : 45 जागा जिंकण्याचं मिशन

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने गेल्या काही महिन्यांपासूनच सर्वच लोकसभा मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. देशात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राज्यात भाजपने राजकीय समीकरणं जुळवणं सुरू केलं आहे. महाराष्ट्रात भाजपने 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.

हेही वाचा >> “…मग मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही”,प्रकाश आंबेडकरांचा ’इंडिया’ला मेसेज

भाजपच्या नेत्यांकडून महाराष्ट्रात महायुती 45 पेक्षा जास्त जागा जिंकेल असे दावे केले जात आहे. त्यासाठी कोणत्या मतदारसंघात कुणाला तिकीट द्यायचं, यावर भाजपत विचारमंथन सुरू आहे.

ADVERTISEMENT

ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्रात कुणाला किती जागा?

महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने एबीपी-सी व्होटरने सर्व्हेक्षण केले. लोकसभेच्या 48 जागांपैकी सर्वाधिक जागा महाविकास आघाडीला मिळतील असा निष्कर्ष सर्व्हेतून समोर आला आहे. महाविकास आघाडी 26 ते 28 जागा मिळू शकतात. तर भाजप प्रणित एनडीएला 19 ते 21 जागा मिळू शकतात. 2 जागा इतरांना मिळणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT