Vaibhavi Upadhyaya Death : कार कोसळली दरीत! अभिनेत्रीचा भयंकर अपघातात मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sarabhai Vs Sarabhai fame TV actress Vaibhavi Upadhyay died in a road accident, her car fell into gorge
Sarabhai Vs Sarabhai fame TV actress Vaibhavi Upadhyay died in a road accident, her car fell into gorge
social share
google news

Sarabhai Vs Sarabhai’s Actress Vaibhavi Upadhyaya Died : मनोरंजनविश्वातून एक अतिशय धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आलीये. लोकप्रिय मालिका ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचं अपघाती निधन झालं आहे. वैभवीच्या निधनाचे वृत्त समोर येताच टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. वैभवी उपाध्यायच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने सेलिब्रिटींसह चाहत्यांनाही धक्का बसला आहे. (Famous TV actress Vaibhavi Upadhyay died in a road accident)

Actress Vaibhavi Upadhyaya : अपघात कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा अपघात कुल्लूच्या बंजारमध्ये 22 मे रोजी म्हणजेच सोमवारी झाला. एका भीषण अपघातात अभिनेत्री वैभवीला आपले प्राण गमवावे लागले. वैभवी उपाध्याय तिच्या पतीसोबत कारमधून प्रवास करत होती, अशी माहिती आता समोर आली आहे.

हेही वाचा >> जयंत पाटलांचं कौतूक, ठाकरेंनी सगळा इतिहासच काढला! ‘सामना’तून पुन्हा ‘वार’

ते दोघे तीर्थन व्हॅलीमध्ये फिरायला जात होते. जात असताना एका वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार दरीत कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चेंदामेंदा झाला. यात अभिनेत्रीचा मृत्यू झाला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रूपाली गांगुलीला बसला धक्का

वैभवीच्या मृत्यूच्या बातमीने टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुलीला मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर वैभवीचा फोटो शेअर करून दुःख व्यक्त केले आहे. रुपालीने लिहिले “खूपच लवकर सोडून गेलीस.”

याशिवाय रुपालीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर वैभवीचा एक रील व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने लिहिले आहे की अभिनेत्रीच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास बसत नाही.

ADVERTISEMENT

actress rupali ganguly shares post after Vaibhavi Upadhyaya Death
रुपाली गांगुलीने वैभवी उपाध्यायच्या निधनानंतर व्यक्त केला शोक.

निर्मात्याने दुःख व्यक्त केले

प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते जेडी मजिठिया यानेही तरुण आणि प्रतिभावान अभिनेत्री वैभवीच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर केली आणि लिहिले आहे की, “आयुष्य इतके अनिश्चित असू शकते यावर विश्वासच बसत नाही. एक अतिशय चांगली अभिनेत्री आणि खास मैत्रीण वैभवी उपाध्याय, जी ‘साराभाई vs साराभाई’ची ‘जास्मीन’ म्हणून प्रसिद्ध होती. तिचे निधन झाले आहे. तिचा अपघात झाला आहे. कुटुंबीय उद्या सकाळी अकराच्या सुमारास तिचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी मुंबईत आणणार आहेत.”

ADVERTISEMENT

Vaibhavi Upadhyaya Death update
निर्माते जेडी मजिठिया यांनी वैभवी उपाध्यायच्या निधनानंतर पोस्टमधून व्यक्त केल्या भावना.

चाहत्यांना दुःख अनावर

हसतमुख आणि आनंदी अभिनेत्री असलेल्या वैभवीच्या आकस्मिक निधनाने या चाहत्यांनाही दुःख अनावर झाले आहे. अभिनेत्रीच्या कुटुंबासह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर सर्व जण तिच्या अशा अचानक जाण्याबद्दल हळहळ व्यक्त करत आहेत.

दीपिका पदुकोणसोबत केले होते काम

वैभवी एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री होती. तिने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. पण ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेतून वैभवीला विशेष ओळख मिळाली. या शोमधील तिच्या पात्राचे नाव जास्मीन होते.

हेही वाचा >> MVAचा जागा वाटपाचा तिढा सुटला? नाना पटोलेंनी ‘मुंबई Tak’वर सांगितला फॉर्म्युला

वैभवीने साकारलेल्या भूमिकेला आणि तिच्या अभिनयाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम लाभलं. टीव्ही शो शिवाय वैभवीने दीपिका पदुकोणच्या छपाक या चित्रपटातही काम केले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT