आकाशवाणीच्या संगीत संमेलनाला आता भारतरत्न पंडित भीमसेन जोशीचं नाव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आकाशवाणी संगीत संमेलन आता यापुढे पंडित भीमसेन जोशी संगीत संमेलन म्हणून ओळखले जाईल. अशी घोषणा माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. पुण्यात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात जावडेकर बोलत होते.

ADVERTISEMENT

या कार्यक्रमात बोलताना जावडेकर म्हणाले की, ‘दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओने पंडित भीमसेन जोशी यांच्या विशाल संगीताच्या कोषाचे दरवाजेच जणू सामान्य जनतेसाठी खुले केले आहेत. त्यांचे रेकॉर्डिंग्स आता यु ट्यूबवर उपलब्ध आहे आणि ते देशातील सर्व चाहत्यांपर्यंत पोहचावं यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालय प्रयत्न करत आहे.’

‘संगीत हे अनेक प्रकारांमध्ये आहे आणि त्यात आपल्याला प्रेरित करण्याची मोठी शक्ती आहे. पंडित भीमसेन जोशी यांच्या आशीर्वादामुळे आर्य संगीत मंडळ गेल्या 67 वर्षांपासून सलग संगीतविषयक कार्य करत आलं आहे. पंडितजींनी ज्या प्रकारे विदेशात आपल्या शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम केले. तसेच त्यांनी देशातील सर्व स्तरातील लोकांसाठी देखील कार्यक्रम केले.’ असंही जावडेकर म्हणाले.

हे वाचलं का?

पंडित भीमसेन जोशी यांना 2009 साली भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९२२ रोजी कर्नाटकच्या गदग येथे झाला होता. पण पंडित भीमसेन जोशी यांची कर्मभूमी ही पुणेच होती. इथेच त्यांनी अनेक संगीत प्रकाराची निर्मिती केली. याच भूमीत त्यांनी प्रसिद्धी आणि सारं काही मिळवलं.

ADVERTISEMENT

दरम्यान, या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी आवर्जून हजेरी लावली होती. यावेळी शरद पवार यांनी लोकांमध्ये संगीत पसरविण्याच्या ऑल इंडिया रेडिओच्या भूमिकेचे कौतुक देखील केले.

ADVERTISEMENT

पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे आर्य संगीत मंडळाच्यावतीने दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम उद्या (रविवार) सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत दाखवण्यात येणार आहे. या विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ गायक पंडित अजॉय चक्रवर्ती, किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे, ज्येष्ठ सितार वादक उस्ताद शाहिद परवेझ, प्रख्यात शास्त्रीय गायक कौशिकी चक्रवर्ती आणि पंडितजी यांचे शिष्य पंडित उपेंद्र भट, आनंद भाटे, श्रीनिवास जोशी आणि विद्याधर वर्मा हे सादरीकरण करणार आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT