मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधूचं मराठी कनेक्शन, कोण आहे ट्रान्सजेंडर साईशा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतीय सौंदर्याने पुन्हा एकदा जगाला भुरळ घातली. जागतिक पटलावर महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताच्या हरनाज कौर संधूने बाजी मारली.हरनाजने मिस युनिव्हर्स स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं असून, तब्बल 21 वर्षानंतर भारताला हा सन्मान मिळाला आहे. यापूर्वी लारा दत्ताने 2000 मध्ये मिस युनिव्हर्स स्पर्धेत विजेता ठरली होती. मात्र या विजयामागे एका मराठी व्यक्तीचा हात आहे. कोण आहे ती मराठी व्यक्ती जाणून घेऊया

ADVERTISEMENT

हरनाजने यावेळी सी-थ्रू एम्बेलिश्ड गाऊन ग्रँड फिनालेसाठी परिधान केला होता. हा गाऊन भारतातील एक प्रसिद्ध ट्रांसजेंडर फँशन डिझानयनरने डिझाईन केला होता. हरनाजच्या या ड्रेसची सोशल मिडीयावर बरीच चर्चा रंगली आहे. आपण जाणून घेऊया कोण आहे ती मराठमोळी फँशन डिझायनर

हे वाचलं का?

हरनाजचा गाऊन डिझायन करणारी फॅशन डिझायनर आहे साईशा शिंदे. नुकतंचजानेवारी २०२१ मध्ये स्वप्निल शिंदेची सायशा शिंदे झाली होती. स्वप्निल शिंदेनी जानेवारी मध्ये आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आता मी एक ट्रांसवूमन असून माझी ओळख आजपासून सायशा शिंदे अशी असेल असं जाहीर केलं होतं. बॉलिवूडमधील अभिनेत्री करिना कपूर ,श्रध्दा कपूर आणि अनुष्का शर्मा या आघाडीच्या अभिनेत्रींचं सायशा ड्रेस डिझाईन करते. अनेक सिनेमांमध्येही फॅशन डिझायनर म्हणून सायशाने काम केलं आहे.

हरनाजने मिस युर्निव्हर्सचा किताब पटकावल्यावर साईशानेआपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहीत आपला आनंद व्यक्त केला आहे. तीने हा गाऊन तयार होत असतानाचा फोटो शेअर करत म्हटलं आहे की खूप जास्त टेन्शन होतं मला, रात्रीची झोप उडाली होती माझी, मी एका सुंदर मुलीला आपल्या विचारात सामावून घेत होते. हा ड्रेस डिझाईन करताना एका महिलेची कसोटी होती. आणि हो मला खात्री आहे की हा ड्रेस मिस युनिव्हर्स २०२१ साठीच लायक होता.

ADVERTISEMENT

जानेवारी २०२१ मध्ये स्वताला ट्रांसजेंडर म्हणून जाहीर केल्यावर बोलताना सायशा म्हणाली होती की मला लोकांनी ट्रांसजेंडर म्हणूनच ओळखावं, काही लोकांना आयुष्यात खूप उशिरा या गोष्टीची अनुभुती होते. मात्र आता मला याची अनुभुती झाली असून मी माझ्या निर्णयावर ठाम आहे आणि याचा मला आनंदही आहे.

ADVERTISEMENT

आणि आता हरनाजचा मिस युर्निव्हर्स ड्रेस डिझायन केल्यामुळे साईशा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT