अभिनेता सोनू सूदच्या तीन शहरांतील घरांची IT कडून झाडाझडती
अभिनेता सोनू सूद आयकर विभागाच्या रडारवर असून, सोनू सूदच्या तीन शहरांतील घरांची आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून झाडाझडती घेतली जात आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी आयकर विभागाने सोनू सूदच्या ६ मालमत्तांची पाहणी करण्यात आली होती. आयकर विभागाने १५ सप्टेंबर रोजी सोनू सूदच्या मुंबईतील सहा मालमत्तांच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली होती. या पाहणीत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व खात्यांच्या नोंदी, मिळणारे […]
ADVERTISEMENT
अभिनेता सोनू सूद आयकर विभागाच्या रडारवर असून, सोनू सूदच्या तीन शहरांतील घरांची आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून झाडाझडती घेतली जात आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी आयकर विभागाने सोनू सूदच्या ६ मालमत्तांची पाहणी करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
आयकर विभागाने १५ सप्टेंबर रोजी सोनू सूदच्या मुंबईतील सहा मालमत्तांच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली होती. या पाहणीत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व खात्यांच्या नोंदी, मिळणारे उत्पन्न, खर्च आणि इतर आर्थिक व्यवहाराच्या नोदींची तपासणी केली होती. त्याचबरोबर इतर आर्थिक व्यवहारांचीही पडताळणी करण्यात आली होती.
मुंबईतील मालमत्तांची आयकरकडून पाहणी करण्यात आल्यानंतर आज पुन्हा एकदा आयकरचे अधिकारी सोनू सूदच्या तीन शहरांतील घरी दाखल झाले आहेत. मुंबई, नागपूरसह राजस्थानातील जयपूर येथे असलेल्या घराची आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जात आहे.
हे वाचलं का?
Actor Sonu Sood आयटी विभागाच्या रडारवर, सहा ठिकाणी करण्यात आली पाहणी
सोनू सूदवरील कारवाईवर शिवसेना म्हणते…
ADVERTISEMENT
‘कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी सोनू सूद भलत्याच झोतात आला. गोरगरिबांचा मसीहा, मुंबईतून परराज्यांत जाणारे मजूर वगैरे लोकांचा आधारस्तंभ म्हणून त्याचा बोलबाला सुरू झाला. बसेस, ट्रेन्स, विमाने बुक करून सोनू सूद मुंबईत अडकलेल्या लोकांना परराज्यांतील त्यांच्या घरी पाठवीत होता. तेव्हा ”जे सोनूला जमते ते महाविकास आघाडी सरकारला का जमत नाही?” असले पाणचट प्रश्न विचारण्यात आले. दुसरे म्हणजे सोनू सूदला खांद्यावर घेऊन मिरवणाऱ्यांत भाजप पुढे होता. सोनू सूद हा आपलाच माणूस असल्याचे त्यांच्याकडून सतत बिंबविण्यात येत होते, पण या सोनू महाशयांनी दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ म्हणून सामाजिक कार्य करायचे ठरवताच त्यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत’, असा दावा शिवसेनेनं केला आहे.
ADVERTISEMENT
सोनू सूद अलीकडेच दिल्ली सरकारच्या ‘देश के मेंटॉर’ अभियानाचा ब्रँड अॅम्बेसेडर बनला आहे. सोनू सूद ट्विटर, फोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना मदत करत आहे. कोरोनाच्या काळात सोनू सूदने ज्या प्रकारे मजुरांना मदत केली, त्याने सर्वांचे मन जिंकले आहे. आजही तो कुणालाही मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT