आशा भोसले यांचं बॉलिवूड संगीत क्षेत्रातील पदार्पण, जाणून घ्या Untold Story

मुंबई तक

Asha Bhosale : आशा भोसले यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना वयाच्या 92 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. पण, त्यांच्या असंख्य चाहत्यांना यावर विश्वास ठेवणं जड जातंय. या दुर्दैवी घटनेनं संगीत क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

ADVERTISEMENT

Asha Bhosale
Asha Bhosale
google news

बातम्या हायलाइट

point

आशा भोसले यांना तीव्र हृदयविकाराचा झटका

point

ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले होते

point

उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

Asha Bhosale : आशा भोसले यांना तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना वयाच्या 92 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. पण, त्यांच्या असंख्य चाहत्यांना यावर विश्वास ठेवणं जड जातंय. या दुर्दैवी घटनेनं संगीत क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

आशा भोसले यांनी मराठी भाषेतून गाणी गाण्यास सुरुवात केली होती, नंतर 1948 साली हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी पदार्पण केले. त्याच काळात नूरजहान, शमशाद बेगम, सुरैया आणि गीता दत्त यांसारख्या गायिकांचे हिंदी चित्रपटसृष्टीवर वर्चस्व होते. आशा भोसले यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान म्हणजे त्यांची मोठी बहीण लता मंगेशकर होत्या. दोघींच्या आवजात काही प्रमाणात साम्य होते, पण लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे आशा भोसले यांच्या आवाजाला एक वेगळी ओळख मिळाली होती.

हे ही वाचा : 'सुरांची बाग उजाड झाली..' आशा भोसले यांच्या निधनाने फडणवीस भावूक; शरद पवारांसह अनेक नेत्यांनी व्यक्त केल्या भावना

एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, सुरुवातीला त्यांना अशी गाणी ऑफर केली जात होती जी प्रसिद्ध महिला पार्श्वगायिकांनी गायलेली नव्हती. कधीकधी गाण्यांचे बोल किंवा त्यातील भावना इतक्या गहन असत की, लोक आणि इंडस्ट्री त्यांच्याच गायनावर नैतिकदृष्ट्या टीका करायचे, पण अशा परिस्थितीत त्यांना मिळालेले गाणे कोणाताही पूर्वग्रह न ठेवता, त्या आनंदाने गायन करायच्या. पुढे जाऊन त्यांच्या गाण्याची शैली जगभर एक ओळख ठरली. 

आशा भोसले यांचा आवाज दिलीप कुमार यांच्या 'संगदिल' (1952), अशोक कुमार यांच्या 'परिणीता' (1953) आणि देव आनंद यांच्या 'सीआयडी' (1956) या चित्रपटांमध्ये वापरला गेला, त्यांना काही गायकांसोबत गाणी गाण्याची संधी मिळाली होती. तत्काली संगीत दिग्दर्शक ओ. पी. नय्यर यांनी सीआयडीमध्ये गाणे गाण्याची संधी दिली, तिथे आशा यांना दिग्गज शमशाद यांची साथ लाभली होती. ते गाणे होते 'लेके पहला पहला प्यार'. शमशाद यांच्या नाकातून येणारा आवाज आणि आशा यांचा कोमल आणि उत्साही आवाज, यामुळे हे गाणे तुम्हाला आकर्षित करेल. याच आकर्षणाने आशा यांच्या कारकि‍र्दीची दिशा बदलली. सीआयडीत त्यांना गाणे गाण्याची ऑफर दिली. आशा आणि नय्यर यांच्या सुपरहिट भागीदाराची सुरुवात झाली, ज्यातून पुढील दोन अनेक हिट गाणी दिली. 1950 च्या दशकाच्या अखेरीस या जोडीची हिट गाणी असलेले अनेक चित्रपट जसे बडे सरकार, कैदी, नया दौरा, तुमसा नही देखा, हावडा ब्रिज आणि कल्पना. 

हे वाचलं का?