महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेचा सन्मान थेट महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडून, खरंच मी याच्या लायक आहे…

मुंबई तक

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता गौरव मोरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. त्याने नुकतीच एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबच शेअर केली आहे. नुकताच गौरवला एका पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला आहे. या पुरस्कराबद्दलची माहिती त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते गौरवला भिमरत्न हा पुरस्कार देण्यात आला आहे. ही आनंदाची बातमी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता गौरव मोरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. त्याने नुकतीच एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबच शेअर केली आहे. नुकताच गौरवला एका पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला आहे. या पुरस्कराबद्दलची माहिती त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते गौरवला भिमरत्न हा पुरस्कार देण्यात आला आहे. ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करत गौरव म्हणाला की, ”भिमरत्न पुरस्कार सोहळा २०२२. खरच मी या पुरस्काराच्या लायक आहे की नाही अजुनही कळत नाहीये. सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकुन देणारयांसाठीचा हा पुरस्कार सोहळा आहे.आणि त्यांच्याच बरोबरीने आपल्यासारख्याला पण एवढा मोठा मान आपण दिलात. खूप आभारी आहे.”

‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून गौरवने टीव्ही विश्वात पदार्पण केलं. या मालिकेत तो विनोदी भूमिका करत होता. पण त्याला खरी ओळख मिळाली ती महाराष्ट्राची हास्यजत्रामधून.यामुले तो महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला. गौगवनं संजू, कामयाब, झोया फॅक्टर या चित्रपटात देखील काम केलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp