Akshay Kumar ला रडताना पाहून भावूक झाला सलमान; व्हिडीओ शेअर करत केलं अक्कीचं कौतुक

मुंबई तक

बॉलिवूड कलाकारांच्या मैत्रीबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण आता इंडस्ट्रीतील दोन आयकॉनिक स्टार्स सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्या ब्रोमान्सने चाहत्यांची मने जिंकली आहेत. अक्षयला रडताना पाहून सलमान खानही भावूक झाला आणि त्याने अक्षयचे खास कौतुक केले. या दोन्ही स्टार्समधील प्रेम आणि मैत्रीची इंटरनेटवर बरीच चर्चा आहे. सलमान खानने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अक्षय कुमारचा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बॉलिवूड कलाकारांच्या मैत्रीबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण आता इंडस्ट्रीतील दोन आयकॉनिक स्टार्स सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्या ब्रोमान्सने चाहत्यांची मने जिंकली आहेत. अक्षयला रडताना पाहून सलमान खानही भावूक झाला आणि त्याने अक्षयचे खास कौतुक केले. या दोन्ही स्टार्समधील प्रेम आणि मैत्रीची इंटरनेटवर बरीच चर्चा आहे.

सलमान खानने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अक्षय कुमारचा एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अक्षय कुमार खूपच भावूक दिसत आहे. एका रिअॅलिटी शोमध्ये बहिणीचा भावनिक संदेश ऐकल्यानंतर अक्षयच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला इच्छा असूनही अश्रू आवरता येत नाहीत.

सलमाननं केलं अक्षयचं कौतुक

सलमान खानने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अक्षयचा हा भावनिक व्हिडिओ शेअर करून अॅक्शन स्टारचे कौतुक केले. व्हिडिओ शेअर करताना सलमानने कॅप्शनमध्ये लिहिले, मला असे काहीतरी सापडले, जे पाहून मला वाटले की ते सर्वांसोबत शेअर केले पाहिजे. देव तुला आशीर्वाद देवो. अक्की, तू खरोखर कमाल आहेस, हे पाहून खूप आनंद झाला. फिट राहा, काम करत राहा. मला आशा आहे की देव सदैव तुझ्यासोबत आहे, असं सलमाननं आपल्या इंस्टा स्टोरीमध्ये लिहिलं आहे.

अक्षयने मानले सलमानचे आभार

सलमान खानचे अक्षय कुमारने खास आभार मानले आहेत. अक्षयने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सलमानची पोस्ट पुन्हा शेअर केली आणि लिहिले- तुझा संदेश हृदयाला स्पर्शून गेला. देव तुझंही भलं करो. चमकत राहा. सलमान आणि अक्षय यांच्यातील इतकं प्रेम पाहून दोघांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. या दोघांना पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सलमान खान आणि अक्षयने आत्तापर्यंत ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘जान-ए-मन’ या दोन चित्रपटात एकत्र काम केले आहे. दोघांना एकत्र काम करताना पाहणे चाहत्यांसाठी ट्रीटपेक्षा कमी नसणार आहे.

आगामी प्रोजेक्ट

सलमानबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या बिग बॉस 16 होस्ट करत आहे. सलमान खान लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ आणि ‘टायगर 3’ मध्ये दिसणार आहे. त्याचवेळी अक्षय कुमार पुढच्या वर्षी ओ माय गॉड 2 मध्ये दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे बडे मिया छोटे मिया देखील आहे. बाय द वे, अक्षय आणि सलमानची मैत्री पाहून तुम्हाला कसे वाटले?

हे वाचलं का?

    follow whatsapp